आंभोराजवळ नागरिकांनी जाळली इंडिका;दोघांचा मृत्यू तर सात जण जखमी

0
15

अांभोराजवळील अपघातात ऑटोचालकासह विद्यार्थाचा मृत्यू तर सात जण जखमी
गोqदया berartimes.com-दि.२७ -गोंदिया बालाघाट राज्यमार्गावर असलेल्या आंभोरा गावाजवळ आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास बिरसी विमानतळाच्या एका इंडिका वाहनाने आटोला दिलेल्या धडकेमूळे ऑटोमध्ये असलेला ९ वर्षीय शाळकरी मुलाचा व ऑटोचालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.तर ९ जण जखमी झाल्याने संतप्त नागरिकांनी इंडिका कारलाच आग लावून गोंदिया बालाघाट मार्गावर रस्ता रोको आंदोलन केले.
ृमृतामध्ये ऑटोचालक किशोर रामटेके व निर्मल स्कुल गोंदियाचा विद्यार्र्थी आर्यन देशभ्रतार यांचा समावेश आहे.जखमीमध्ये आटोचालकाचा मुलगा अक्षय रामटेकेसह बसस्थानकावर बसची वाट बघत उभे असलेले आंभोरा गावातील गजभिये कुटुंबातील १० वर्षीय तन्मय गजभिये ,गुरुमाला गजभिये ,संजीवनी गजभिये ,भागात गजभिये ,कीर्ती गजभिये ,अजना गजभिये ,सलोनी गजभिये ,अक्षय रामटेके ,संतोष घनतले यांचा समावेश आहे.तर घटनास्थळावरून कारचालक दिपक जांगळेना पळ काढला असून गोंदिया ग्रामीण पोलीस त्याचा शोध घेत आहे.
अपलहेी :- गोंदिया बालाघाट मार्गावर आज सकाळी ९ वाजे झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे तर बस स्थानकावर बस ची वाट बघणा?्या एकाच कुटूंबातील सात लोक आणि इतर दोन असे एकूण ९ लोक या अपघातात जखमी झाले असून जखमींवर गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे तर संतपतलेल्या गावक?्यानी इंडिका गाडीला आग लावली
गोंदियापासून ४ किलोमीटरवरीव गोंदिया- बालाघाट मार्गावरील अंभोरा बस्थानकावर प्रवाश्याची वाट पाहत उभ्या असलेल्या ऑटोला गोंदियावरुन बिरसी विमानतळावर चाललेल्या इंडिका कारच्या चालकाने हयगयीने वाहनचालवित ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात बसस्थानकावर उभ्या असलेल्या आटोला मागून धडक दिली.या धडकेत ऑटोमध्ये तिघांपैकी ऑटो चालक किशोर रामटेकेचा घटनास्थळीच मृत्यू झाला.तर ऑटोमध्ये बसलेल्या ९ वर्षीय आर्यन देशभ्रताल या शाळकरी मुलाचा उपचारा दरम्यान बजाज रुग्णालयात मृत्यू झाला.आटो चालकाचा मुलगा अक्षय रामटेके हा देखील जखमी झाला.तर धडकेने ऑटो पलटल्याने बसस्थानकावर बसची वाट बघत असलेल्या अंभोरा गावातील गजभिये कुटूंबातील सात तर इतर दोन जण असे एकूण ९ जण गंभीर जखमी झाले.त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघात घडताच इंडिकाच्या वाहनचालकाने वाहन तिथेच सोडून पळ काढल्याने संतप्त जमावाने वाहनाची जाळपोळ करुन रस्ता रोको आंदोलन केल्याने गोंदिया ग्रामीण पोलिसठाण्यातील पोलिसांसह मुख्यालयातील पोलिसांना पाचारण करुन जमावाला पांगविण्यात आले.एक ते दोन तासानंतर सदर रस्ता वाहतुकीसाठी पोलिसांनी सुरु केला.