सqवधान चौकात आ.फुकेंचा नोंदविला पवार कृती समितीने निषेध

0
14

berartimes.com नागपूर, दि.५ -समाजातील ज्येष्ठ समाजसेवक घनश्याम चौधरी यांच्यावर आमदार डॉ.परिणय फुके व त्यांच्या सहकाèयांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्याचा निषेध म्हणून संविधान चौक येथे आज रविवार ५ मार्चला पवार कृती समितीच्यावतीने निदर्शने करण्यात आली.या निदर्शने आंदोलनात नागपूरातील कृती समितीचे १००-१५० पदाधिकारी सहभागी झाले होते.सकाळी ११ वाजता सqवधान चौकात एकत्र येऊन फुके यांनी केलेल्या गैरकृत्याचा निषेध नोंदवित त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासंबधी निदर्शने करण्यात आली.
पांढराबोडी नागपूर येथील रहिवासी असलेल्या चौधरी यांच्यावर २१ फेब्रुवारी रोजी प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. यामध्ये चौधरी यांच्यासह त्यांचे सहकारीही जबर जखमी झाले होते. त्यांना पोलिसांच्या मदतीने रविनगर येथील दंदे हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आले होते. अपंग असलेले चौधरी हे सामाजिक कार्यकर्ते असून राजकारणात ते भारतीय जनता पक्षाचे जुने सक्रिय सदस्य आहेत.त्यांच्यावर राजकीय वैमनस्यातूनच आमदार परिणय फुके आणि त्यांच्या अनेक सहकाèयांनी पूर्वनियोजित कट रचून प्राणघातक हल्ला केला होता. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली असून, अद्यापही त्या संदर्भात काही कारवाई करण्यात आली नसल्याने या घटनेचा निषेध म्हणून पवार समाज कृती समितीच्यावतीने आज सqवधान चौकात निदर्शने करण्यात आली.पोवार समाजातील व्यक्तीवर नागपूरात अशाप्रकारचा हल्ला होण्याची ही पाचवी घटना असून न्याय न मिळाल्यास समाज रस्त्यावर येऊन आंदोलन उभारणार असल्याचे पवार कृती समितीने म्हटले आहे. निदर्शेने आंदोलनात कृष्णा देवासे,मनोज चव्हाण,रमेश टेंभरे, एस.एम. पारधी, गजेंद्रसिंह ठाकूर, पृथ्वीराज रहांगडाले मधुकराराव चोपडे,मुकेश चोपडे,देवराव ढोले,अजय फरकाडे,संजय ढोले,रमेश पारधी,लिलाधर पटले,देवेंद्र टेंभरे,सुरेश देशमुख,जियालाल शरणागत,छगन कटरे,विजेंद्रसिह ठाकूर,श्रावण फरकाडे,परमानंद बोपचे,महेंद्र पारधी,मोतीलाल चौधरी,व्डीडीएस बोपचे,केवल कटरे,गौतम,मनिष कोल्हे,नरेंद्र डोगंरे,नामदेवराव रबडे,येळे,संजय फरकाडे व सागर इंगळे,सचिन दंडाये,डोंगरे आदी समाजबांधव सहभागी झाले होते.