महिला काँग्रेसचे रॉकेल, गॅस सिलिंडर दरवाढी विरोधत आंदोलन

0
9

मोहाडी दि.9: केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूंच्या केलेल्या भाववाढीचा निषेध करण्यासाठी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सीमा भुरे यांच्या नेतृत्वात मोहाडी येथे महिला काँग्रेस कमेटीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.रॉकेल, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने होणाऱ्या दरवाढीमुळे सर्वसामान्य हैरान झाले आहेत. सामान्यांचे महिन्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. केंद्र सरकार सर्वसामान्य जनतेच्या घामाचा पैसा धनदांडग्यावर खर्ची घालत असल्याचा आरोप महिला काँग्रेसने केला, या आशयाचे निवेदन नायब तहसीलदार रामभाऊ थोटे यांना देण्यात आले.
निवेदन देताना जिल्हाध्यक्ष सीमा भुरे, नगराध्यक्ष स्वाती निमजे, ज्योती चिंधालोरे, वंदना मेश्राम, रजिया शेख, यमुना श्रीपाद, मंगला पराते, गोदावरी देशमुख, कौतीका रायकवाड, नंदा हेडाऊ, मिना निखारे, जानकी रायकवाड, अंजनी नंदनवार, नगरसेविका कविता बावणे, गीता बोकडे, अंतकला मारबते, सुनिल सोरते, कुसुम सोरते, सुनिता टेंभुर्णे, वैशाली भवसागर, सुरेखा शहारे, नगरसेविका रागीनी सेलोकर, शकुंतला धकाते, गवराबाई पराते, शोभा बुरडे, कमल श्रीपाद, लता निमजे, कांता मेहर, उषा मारबते, सरिता पडोळे, तुळशी पराते, आशा बुरडे यांच्यासह महिला काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह अनेक महिला उपस्थित होत्या.