जागतिक महिलादिनी महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार

0
8

गोंदिया दि.9: : ग्रामीण भागात आरोग्य सेवेत उत्कृष्ट काम करणाऱ्या आरोग्य सेविका, आंगणवाडी सेविका व गर्भवती महिलांना रूग्णालयात आणण्यासाठी महत्वाची भूमीका बजावणाऱ्या आशा कार्यकर्ती यांचा जागतिक महिलादिनी जिल्हा परिषदेच्या सभागृहात सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्ष उषा मेंढे, उद्घाटक म्हणून मुकाअ डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, शिक्षण सभापती पी.जी. कटरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य आर.एल. पुराम, महिला व बाल कल्याण सभापती विमल नागपुरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, महिला व बाल कल्याण उपमुख्य कार्यपालन अधिकारी ज.द. अंबादे, जिल्हा कृषी अधिकारी वंदना शिंदे उपस्थित होते.
कायाकल्प पुरस्कारासाठी सन २०१६-१७ या वर्षासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र चोपा येथील डॉ. अशोक तारडे व डॉ. राधेश्याम पाचे यांना दोन लाखाचा प्रथम पुरस्कार वाटप करण्यात आला.प्रोत्साहनपर पुरस्कार ५० हजार रूपये देण्यात आला. त्यात महागाव येथील डॉ.स्वप्नील हाके, मुल्ला येथील डॉ.व्ही. वाय. पटले, डॉ.गायकवाड, भानपूर येथील डॉ.वेदप्रकाश चौरागडे, डॉ. कटरे, ठाणा येथील डॉ. अश्वीन जनईकर, डॉ.गगन गुप्ता यांना पुरस्कार देण्यात आला. शस्त्रक्रियेची उद्दीष्ट्ये पूर्ण करणाऱ्या डॉक्टर व आरोग्य सहाय्यीकांसह १९ जणांना गौरविण्यात आले. यात डॉ. व्ही.सी. वानखेडे, डॉ.व्ही.वाय.पटले, डॉ.डी.एस. हुमने, डॉ. सुमीत पाल, डॉ. गजानन काळे, डॉ. एन.एस. येळणे, डॉ. डी.डी. रायपुरे, डॉ. वेदप्रकाश चौरागडे, डॉ. ए.व्ही. कांबळे, डॉ. अश्वीन जनईकर, डी.के. सोनटक्के, रसिका धनविजय, के.डी.शिंदे, एम.व्ही. हुद्दार, वाय.पी. बाबरे, एस.ए. जोसेफ, सी.पी. मानवटकर, एन.पी. चापले, के.बी. मेघाते, फ्लारेंस नाइटिंगल पुरस्कार बनगाव आरोग्य केंद्राच्या छाया सुर्यवंशी यांना प्रथम, केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयातील निरंजन फुलझेले यांना द्वितीय तर वडेगाव येथील एम.व्ही. बन्सोड यांना तृतीय स्टॉफ नर्सचा पुरस्कार देण्यात आला. एल.एच.व्ही. प्रथम पुरस्कार ठाणा येथील कमला मेघाते प्रथम, मुल्ला येथील धर्मशीला सोनटक्के द्वितीय तर भानपूर येथील सी.पी. मानवटकर तृतीय पुरस्काराचे मानकारी ठरल्या. ए.एन.एम. मधून दहेगाव उपकेंद्रातील विमल भानारकर प्रथम, कवलेवाडा येथील बी.पी. कटरे द्वितीय तर बनगाव येथील वर्षा बांबल तृतीय पुरस्काराच्या मानकरी ठरल्या.डॉ.आनंदीबाई जोशी प्रथम पुरस्कार २५ हजार रुपये प्राथमिक आरोग्य केंद्र भानपूर, द्वितीय १५ हजार प्राथमिक आरोग्य केंद्र चोपा तर तृतीय पुरस्कार १० हजार रुपये प्राथमिक आरोग्य केंद्र देवरीला देण्यात आला.
उपकेंद्र गटात प्रथम पुरस्कार १५ हजार चिचगाव उपकेंद्राता द्वितीय १० हजार डोंगरवार उपकेंद्राला तर तृतीय ५ हजाराचा पुरस्कार फुलचूर ला देण्यात आला. ग्रामीण रूग्णालय गटात प्रथम पुरस्कार उपजिल्हा रूग्णालय तिरोडाला ५० हजार देण्यात आला. उत्कृष्ट आरोग्य सेविका व मदतनिस म्हणून गोंदिया प्रभाग क्र.१ मधून सेवंता बघेले व सविता मस्करे, गोंदिया २ मधून कुसुम लिचडे व आशा टेंभुरकर, आमगाव मधून बसंती चव्हाण व उर्मिला देवगिरी, सालेकसा तालुक्यातून शशिकला चिंधालोरे व गजा उईके, गोरेगाव तालुक्यातून निरंजना बोपचे व खुशरंता सौंदरकर, देवरी लक्ष्मी गायधने, धुरपता जांभूळकर, तिरोडा ललीता रोडगी, सविता कालसर्पे, अर्जुनी मोरगाव अनुसया कापगते, मालता सांगोळकर, सडक अर्जुनी शाहिदा शेख व धनवंता जांभुळकर यांचा सत्कार करण्यात आला. सोबत जिल्ह्यातील ४० आशा कार्यकर्तांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी कार्यक्रमाला उपस्थित होते.