पत्रकार संरक्षण कायदा तत्काळ लागू करा

0
10

वर्धा दि.११: राज्य शासनाकडे अनेक दिवसांपासून प्रलंबीत असलेला पत्रकार संरक्षण कायदा तात्काळ लागू करावा यासह विविध मागण्यांसाठी १0 मार्च रोजी बजाजचौक येथून पत्रकारांचा मोर्चा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडकला.पत्रकारांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे पोलीस अधीक्षक यांच्या मार्फत निवेदन दिले. या निवेदनात पत्रकार संरक्षण कायदा तात्काळ लागू करा. तसेच आकसपोटी पत्रकारांना आरोपात अटकवून प्रतिमा मलीन करण्याचा प्रकार बंद करावा. प्रथम चौकशी करूनच कारवाई करावी. अनेक पत्रकारांना गंभीर आरोपात अडकविले. मात्र न्यायालयात शिक्षा झाली नाही. त्यामुळे न्यायालयाचा अमुल्य वेळ व यंत्रणेला नाहक मनस्ताप सहन करावा लागला. अशा प्रकरणात सुडबुद्धीने गुन्हे दाखल करणार्‍या अधिकार्‍यावर कारवाई करावी, गंभीर गुन्हे दाखल करून पुराव्या अभावी अथवा सातत्याने साक्ष देणार्‍या पंचांना न्यायालयात हजर करून खोटी साक्ष नोंद करून अखेर आरोपातून निर्दोष झालेल्या पत्रकारांचा अमुल्य वेळ वाया गेल्याने तसेच झालेले नुकसान तथा मानहाणीम्हणून शासनाने १ लाख रुपये भरपाई देण्यात यावी व तसा कायदा करावा. वर्धा येथील रामनगरच्या ठाणेदारांनी सुडबुद्धीने पत्रकार दिलीप भुजाडे यांच्यावर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या मोर्चाचे नेतृत्व स्व. पी.एल. सिरसाट प्रणीत ग्रामीण पत्रकार संघाच्या राज्य अध्यक्ष चंदा सिरसाट, कार्याध्यक्ष मंगेश चोरे यांच्या नेतृत्वात या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात म.रा. मराठी पत्रकारसंघाचे जिल्हाध्यक्ष दिनेश पाटील, श्रमिक पत्रकारसंघाचे अध्यक्ष प्रवीण धोपटे, जिल्हा मराठी पत्रकारसंघाचे जिल्हाध्यक्ष अजीज शेख, यवतमाळ जिल्हाध्यक्ष ओंकार चेके, नागपूर जिल्हाध्यक्ष राकेश मरजीवे, विनोद पन्नासे चंद्रपूर, योगेश कांबळे, दीपक तिवरे, प्रकाश झांजडे, रविंद्र कोटंबकार, वसंत पंचभाई, डॉ. संदीप लोंढे, महेंद्र लोखंडे, राजू वाटाणे, बाळा साटोणे यांच्यासह ग्रामीण भागातील पत्रकारांची उपस्थिती होती.