पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, 11 ठार

0
10

मुंबई, दि. 11 – पुणे-सोलापूर महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्स आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये अकरा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे – सोलापूर महामार्गावर उरळीकांचन येथे मुंबईतील मुलुंडहून अक्कलकोटला जाणा-या ज्योती या खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. ही घटना पहाटे साडेचारच्या सुमारास घडली. महामार्गावर रानडुक्कर ट्रॅव्हल्सच्या आडवं आल्यामुळे चालकाचं नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला. या अपघातात अकरा प्रवाशांचा मृत्यू झाला असून यामध्ये पाच महिला आणि पाच पुरुषांसह एका लहान मुलीचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.