चंद्रपूर ओबीसी कृती समितीचे मुनगंटीवारांना निवेदन

0
5

चंद्रपूर,दि.११-ओबीसी कृती समिती चंद्रपूरच्यावतीने राज्याचे अर्थमंत्री व चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना आज शनिवारला भेटून ओबीसी एनटीव्हीजे व विशेष मागासप्रर्वग मंत्रालयासंदर्भातील निर्णय त्वरीत लागू करण्यासंबधीचे निवेदन सादर करण्यात आले.या निवेदनात ओबीसी विद्याथ्र्यासांठी वसतीगृह सुरु करणे,ओबीसी मंत्रालयासाठी मंजुर करण्यात आलेली पदे त्वरीत भरण्यात यावे.सचिव व अधिकारी यांच्यासह जिल्हास्तरावरही सदर कार्यालय सुरु करण्यात यावे.येत्या अर्थसंकल्पात ओबीसी मंत्रालयासोबतच ओबीसींसाठी भरीव तरतूद करण्याची मागणी करण्यात आली.निवेदन देतेवेळी सयोंजक सचिन राजुरकर,बबनराव वानखेडे,कमलाकर गुरनुले,शाम राजुरकर,दिनेश कष्टी,रवी टोंगे,सुरेश कावळे,देवानंद वाढई,लिलाधर तिवाडे,प्रमोद शाष्टाकर व पुरुषोत्तम राऊत उपस्थित होते.