थकीत मजुरीसह बिडीओच्या निलंबनाला घेऊन झाडावर चढला इसम

0
11

गोंदिया,दि.१५(berartimes.come) : गोरेगाव तालुक्याच्या कमरगाव येथे २०१२ -१३ मध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत झालेल्या कामाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, पूर्ण मजुरी देण्यात यावी, अशी मागणी करता करता प्रशासनाचे उंबरठे झिजविले. मात्र, पदरी निराशाच आली. त्यामुळे संतप्त झालेल्या पीडित मजुराने आज, बुधवारी जिल्हा परिषदेसमोरील झाडावर चढून विरूगिरी केली. या प्रकारामुळे जिल्हा परिषद वर्तुळात एकच खळबळ उडाली. रोजगार सेवक व गटविकास अधिकाèयावर कारवाईचे ठोस आश्वासन मिळणार नाही, तोपर्यंत झाडावरून खाली उतरणार नाही, असा पवित्रा मजुराने घेतला. त्यामुळे अनूचित प्रकार घडू नये म्हणून गोंदिया ग्रामीण पोलिसांना माहिती कळताच त्यांनी दलबलासह जि.प.गाठले.सोबत अग्निशमन विभागाच्या गाड्या व रुग्णवाहिकाही.त्या विरुगिरी करणाèया मजुराचे नाव लिखिराम काशीराम राऊत (वय ६५, रा. कमरगाव,ता.गोरेगाव) असे आहे.वृत्तलिहिपर्यंत सदर मजुर झाडावरुन खाली उतरण्यास तयार नव्हता.जोपर्यंत बीडीओवर कारवाई होत नाही,तोपर्यंत खाली येणार नाही या मागणीवर सदर मजुर ठाम होता.जेव्हा जिल्हा प्रशासनाच्यावतीने त्यांना लेखी आश्वासन देण्याचे मान्य करण्यात आले होते.