लेखावर्गीय कर्मचाèयांच्या लेखणी बंद आंदोलनाला सुरवात

0
23

गोंदिया,दि.१५(berartimes.com)-विविध मागण्यांना घेऊन महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेच्या वतीने आज १५ मार्चपासून लेखणी बंद आंदोलनाला सुरवात करण्यात आली.गोंदिया जिल्हा परिषदेतंर्गत येणाèया सर्व ८ ही पंचायत समित्यांसह जिल्हा परिषद मुख्यालयातील कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले.सकाळी प्रवेशद्वारावर शासनाच्या भूमिकेच्या निषेध नोंदवित आंदोलनाला सुरवात करण्यात आली.पंचायत समिती स्तरावर गटविकास अधिकारी यांना निवेदन सकाळी देण्यात आले. लेखावर्गिय कर्मचारी संघटनेच्यावतीने शासनाला वारंवार निवेदने देऊन तसेच बैठका होऊनही त्यांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने आंदोलनाची भूमिका घेण्यात आल्याची माहीती संघटनेचे अध्यक्ष शैलेष बैस यांनी बेरार टाईम्सला दिली.सरकारचे लक्ष वेधण्यासाठी संघटनेच्या वतीने १० मार्च ते १४ मार्चपर्यंत काळ्या फिती लावून शासनाचा निषेध नोंदविण्यात आले.तर आज १५ मार्चपासून लेखनी बंद आंदोलनाला सुरवात करण्यात आली.आंदोलन लेखावर्गीय संघटनेच्या दहा मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.या आंदोलनात लेखा कर्मचारी संघटनेचे शैलेष बैस,नितिन काकडे,एल.एच.हरिणखेडे,आनंद चर्चे,टिकेककर,गोपाल शर्मा,तुषार गाढवे,आरती मोरे,शितल यादव हेमलता तरोणे,पुष्पा जाधव,सतिष मानकर,अमृत चुटे,शशी बावनकर,विजय मडावी,उमेश पलस्कर,बहेकार,जाधव,हारुन शेख,ललीत पटले,तिवारी यांच्यासह लेखावर्गीय शाखेचे जिल्हा परिषद,पंचायत समितीमध्ये कार्यरत कर्मचारी सहभागी झाले आहेत.