खा.पटोलेंच्या हस्ते वस्तीगृहाचे भूमिपूजन

0
5

साकोली,दि.१९-सामाजीक न्याय विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या योजनेतून मागासवर्गीय मुलींचे वस्तीगृह बांधकामाचे भूमीपूजन खासदार नाना पटोले यांच्या हस्ते आमदार बाळा काशीवार यांच्या अध्यक्षतेखाली आज(दि.१९)पार पडला. सामाजिक न्याय विभागाच्या ६ कोटी ९६ लक्ष रुपयाच्या निधीतून या वस्तीगृहाचे बांधकाम करण्यात येणार आहे.कार्यक्रमाला साकोलीच्या नगराध्यक्ष धनवंताताई राऊत,जिल्हा परिषद सदस्य डाँ नेपाल रंगारी,रमेश पा.खेडीकर, लखनजी बर्वे , नूतन कांबळे,बंडूभाऊ बोरकर,नंदू हर्षे सर्व नगरपरिषद नगरसेवक,भाजपा पदाधिकारी व परीसरातील नागरिक यावेळी उपस्थित होते.