अंत्योदय एक्सप्रेसचे गोंदिया स्थानकाव उत्साहात स्वागत

0
12

गोंदिया,दि.१९(berartimes.com)- मुंबई-हावडा रेल्वेमार्गावर नव्याने सुरु करण्यात आलेल्या द्विसाप्ताहिक अंत्योदय रेल्वेगाडीचे स्वागत आज रविवारला गोqदया रेल्वेस्थानकावर उत्साहात करण्यात आले.नागपूरवरुन या रेल्वेने आलेले खासदार नाना पटोले यांनी गोंदिया स्थानकावर जिल्ह्याच्यावतीने रेल्वेप्रशासनाचे आभार मानले.तसेच पुढच्या प्रवासाकरीता रेल्वेगाडीला सकाळी ६.४० वाजता हिरवी झेंडी दाखविली.ही गाडी लोकमान्य तिलक टर्मिनल(मुंबई) ते टाटानगर दरम्यान चालणार असून विनाआरक्षीत रेल्वेगाडी आहे.विशेष म्हणजे या गाडीत बसण्यासाठी आरक्षण करण्याची गरज नाही,हे विशेष आहे.गोंदिया स्थानवर हिरवी झेंडी दाखविण्यात आली,त्यावेळी नगराध्यक्ष अशोक इगंळे, रेल्वेचे वाण्यिज व्यवस्थापक सिब्बल, स्टेशन प्रबधंक,मजुर सहकारी संघाचे उपाध्यक्ष दीपक कदम,नगरसेवक भरत क्षत्रीय, बंटी पंचबूध्दे,भाजप शहर अध्यक्ष सूनिल केलनका,काँग्रेसचे महासचिव अमर वèहाडे,निलम हलमारे,अभय सावंत,इंद्रकुमार राही यांच्यासोबत अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.ही रेल्वेगाडी मुंबई येथून शनिवार व मंगळवारला सकाळी ११ वाजता सुटेल आणि रविवार व बुधवारला सकाळी ६.४० ला गोंदिया स्थानकावर येईल.त्याचप्रमाणे सोमवार व गुरुवारला सकाळी ९ वाजता गोंदिया स्थानकावरुन मुंबईकरीता रवाना होईल.