थकीत कर वसुलीसाठी ग्रामविकास अधिकार्‍यावर कारवाई

0
13

लाखांदूर दि. 19 –: नगरपंचायतअंतर्गत २0 लाख रुपये गृहकर थकीत असून यात मोठे थकबाकीदार २६ नागरिक असून मागील अनेक वर्षांपासून गृहकराचा भरणा करीत नसल्याने शनिवारी लाखांदूर नगरपंचायत येथील बाहेरगावी असलेले ग्रामविकास अधिकारी सुरेश कुथे यांच्या घराला सील लावून कारवाई करण्यात आली. त्यामुळे नगरपंचायत कार्यकाळात जप्तीची पहिलीच कारवाई झाल्याने थकबाकीधारकांचे धाबे दणाणले आहेत.
लाखांदूर येथील नगरपंचायत अंतर्गत घरकर थकीत दार जास्त असून कर वसुलीची टक्केवारी ३७.८३ एवढी आहे. त्यामुळे विकास कामाकरिता निधी देताना शासन ज्या नगरपंचायतची १00 टक्के करवसुली असेल त्यांना अधिक प्रमाणात निधी दिला जातो. त्यामुळे नगरपंचायतीने करवसुली सक्तीची केली असून मोठे थकबाकीदार २६ नागरिकांवर जप्तीची टांगती तलवार असून यातीलच मोठे थकबाकीदार सुरेश कुथे यांच्यावर घरजप्तीची कारवाई करून सील ठोकण्यात आले.यावेळी मुख्याधिकारी विशाखा सेलकी, कर निर्धारण अधिकारी पाटील, तीन पंच यांचा समक्ष कारवाई करण्यात आली. मुख्याधिकारी विशाखा सेलकी यांनी नगरात मोठे थकीत कर आहे. ते सक्तीने वसूल करणे आहे. याबाबत जनजागृती केली. परंतु नागरिक सहकार्य करीत नसल्याने अशाप्रकारे जप्तीची कारवाई करावी लागत आहे.