राष्ट्रीय ओबीसी महासंघ शेतकèयांच्या कर्जमुक्तीच्या बाजूने

0
9

नागपूर,दि.१९-राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या आज रविवारला झालेल्या बैठकित सध्या महाराष्ट्रात प्रामुख्याने चर्चेत असलेल्या शेतकरी हिताच्या कर्जमुक्ती प्रश्नावर चर्चा करण्यात आली.महासंघाचे राजकीय सयोंजक माजी खासदार डॉ.खुशाल बोपचे यांनी शेतकरी हा आपल्या ओबीसी समाजातील सर्वात मोठा घटक असल्याने त्यांच्या कर्जमुक्तीसाठी ओबीसी महासंघानेही पुढाकार घेऊन शासनाचे लक्ष वेधणे आवश्यक असल्याचे सांगितले.त्यावर बैठकिला उपस्थित सर्वच मान्यवरांनी शेतकरी कर्जमुक्तीच्या प्रश्नावर राष्ट्रीय ओबीसी महासंघ कर्जमुक्तीच्या बाजुने असल्याचे सांगत प्रस्तावाला समर्थन दिले.त्याचप्रमाणे ओबीसी मंत्रालयासंदर्भात शासनाचे अभिनंदन करण्यात आले.
शासनाने शेतकèयांची कर्जमुक्ती करावे यासाठी लवकरच राज्याचे मुख्यमंत्री यांची भेट घेऊन निवेदन देण्याचे ठरविण्यात आले.ही बैठक राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सयोंजक प्राचार्य डॉ.बबनराव तायवाडे यांच्या अध्यक्षतेखाली धनवटे नॅशनल कॉलेजच्या सभागृहात पार पडली.याबैठकित दिल्ली येथे आयोजित द्वितीय राष्ट्रीय अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यास्थळासह तालुकापातळीवर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे गठण करण्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.शासनाने ओबीसी मंत्रालयात नेमणुका करतांना ओबीसीना प्राधान्य देण्यात यावे,सोबतच राज्य मागासवर्ग आयोगावर ओबीसी चळवळीतील लोकांना शासनाने सामावून घेत ओबीसी मंत्रालयाचे कामकाज व अमलबजावणीसाठी शासनाने ओबीसी चळवळीतील तज्ञासोबतंच बैठक घेण्यावर चर्चा करण्यात आली.पहिल्या टप्यात विदर्भात ओबीसी विद्यार्थी चळवळ व ओबीसींची युवा आघाडी मजबूत करण्यावरही चर्चा झाली.सभेला निमंत्रक सचिन राजुरकर,प्राचार्य अशोक जिवतोडे,सुषमा भड,प्रा.जेमिनि कडू,मनोज चव्हाण,प्रा.रमेश पिसे,जिवन लंजे,शरद वानखेडे,गुणेश्वर आरीकर,निकेश पिणे,विनोद उलीपवार,श्री गायकवाड,प्रा.संजय पन्नासे,उज्वला महल्ले उपस्थित होते.