भाजपकडे दोन, तर आविसं व राष्ट्रवादी काँग्रेसकडे प्रत्येकी एक सभापतिपद

0
22

गडचिरोली,दि.30: येथील जिल्हा परिषदेच्या चार विषय समित्यांच्या सभापतिपदासाठी पार पडलेल्या निवडणुकीत भाजपला दोन, तर आदिवासी विद्यार्थी संघ व राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एक सभापतिपद मिळाले. समाजकल्याण सभापतिपदी भाजपच्या माधुरी उरेते, तर महिला व बालकल्याण सभापतिपदी आविसंच्या जयसुधा जनगाम निवडून आल्या. अन्य दोन समित्यांच्या सभापतिपदासाठी झालेल्या निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या भाग्यश्री आत्राम, व भाजपचे नाना नाकाडे विजयी झाले.
अलिकडेच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला २०, काँग्रेस १५, आदिवासी विद्यार्थी संघ ७, राष्ट्रवादी काँग्रेस ५, अपक्ष २ व ग्रामसभांना २ जागा मिळाल्या. २१ मार्चला पार पडलेल्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या योगीता भांडेकर, तर उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत आविसंचे अजय कंकडालवार निवडून आले. त्यानंतर आज विषय समित्यांच्या सभापतिपदासाठी जिल्हा परिषदेच्या वीर बाबूराव शेडमाके सभागृहात पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी उपमुख्य कार्यपालन अधिकारी तथा सदस्य सचिव विजय मुळीक, तसेच त्यांचे सहकारी अधिकारी उपस्थित होते.सर्वप्रथम समाजकल्याण सभापतिपदासाठी निवडणूक झाली. या पदासाठी भाजप-आविसं