आ.पुरामांनी घेतली बेरार टाईम्सची दखल,ऊर्जामंत्र्यांना पत्र

0
14

देवरी,दि.७-गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी नक्षलग्रस्त भाग असलेल्या देवरीसह आमगाव,सालेकसा तालुक्यात कमी दाबाच्या विज पुरवठ्यामुळे वितपंप जळण्याचे प्रमाण वाढले असून कमी दाबामुळे रब्बी पिकाला पाणी देणेही कठीण होऊन बसल्याचे वृत्त बेरार टाईम्सने आपल्या ५ एप्रिलच्या अंकात प्रकाशित केले होते.त्या प्रकाशित वृत्ताची दखल आमदार संजय पुराम यांनी लगेच घेत राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र लिहून गोंदिया जिल्ह्यात विजेच्या कमी दाबामुळे विजपंपाचे नुकसान होत असल्याने कमी दाबाचा प्रश्न सोडविण्याची मागणी केली होती.त्यावर ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी ६ एप्रिल रोजी आ.पुराम यांंच्या समक्ष विज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंत्यांना दुरध्वनी करुन तातडीने कमी दाबाचा प्रश्न निकाली करुन विजवितरणामुळे शेतकèयांचे नुकसान होणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश दिले.