हिमस्खलनात लष्कराची चौकी उद्धवस्त , 3 जवान शहीद

0
9

श्रीनगर, दि. 7 – जम्मू-काश्मीरच्या बटालिक सेक्टरमध्ये झालेल्या हिमस्खलनामुळे पाच जवान अडकल्याची गेल्याची माहिती समोर आली आहे. यातीन तीन जवान शहीद झाले आहेत, दोन जणांना वाचवण्यात यश आले आहे.
काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी सुरू असल्यानं अनेक ठिकाणी हिमस्खलनाच्या घटना होत आहेत. यादरम्यान बटालिक सेक्टर येथील भारतीय लष्कराची चौकी हिमस्खलनात दबली गेली. यात एकूण पाच जवान अडकले गेले. यापैकी तीन शहीद झालेत. दोन जवानांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे, अशी माहिती एका लष्करी जवानानं दिली आहे.