नगरसेवक निलेश कुंभार यांचा स्वाइन फ्लूने मृत्यू

0
14

नागपूर,दि.10- – नगरसेवक निलेश कुंभार यांचा अाज (सोमवारी) स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे. प्रथमच नागपूर महापालिकेत पोहोचलेले कुंभार हे रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते होते. त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या ‘कमळ’ चिन्हावर निवडणूक लढली होती.35 वर्षीय निलेश कुंभार होळीपासून आजारी होते. अविवाहित कुंभार दोन दिवसांपूर्वी कोमात गेले आणि आज (सोमवारी) त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
निलेश कुंभार हे प्रभाग क्रमांक 35 मधून विजयी झाले होते. पाच वर्षांपासून त्यांनी शहरात बांधकाम व्यवसायिक म्हणून नावलौकिक मिळवले होते. त्यांचे वडील निवृत्त बँक कर्मचारी आहेत. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेले कुंभार हे धडाडीचे तरुण नगरसेवक होते.