अमरावतीत इर्वीन चौकात आंबेडकरांना सामुदायिक अभिवादन

0
9

अमरावती,दि.10- भारतरत्नडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंती निमित्य स्थानिक इर्वीन चौक येथे १४ एप्रिल २०१७ ला सकाळी ९.३० वाजता सामुदायिक अभिवान सोहळ्याचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती समन्वयक किशोर बोरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अभिवादन सोहळ्याचे उद्घाटन पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते होणार असून, या वेळी हव्याप्र मंडळाचे सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, कमलताई गवई, खासदार आनंदराव अडसूळ, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड. अरुण शेळके, आमदार डॉ. सुनील देशमुख, महापौर संजय नरवणे, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे, यशवंतराव शेरेकर, माजी मंत्री सुरेंद्र भूयार, वसुधाताई देशमुख, जगदीश गुप्ता, माजी आमदार रावसाहेब शेखावत, सुलभाताइ खोडके, पुष्पाताई बोंडे, अनिल गोंडाणे, संजय बंड, विभागीय आयुक्त जे. पी. गुप्ता, जिल्हाधिकारी किरण गित्ते, पाेलिस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, महापालिका आयुक्त हेमंत पवार, मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. किरण कुळकर्णी, दिलीप एडतकर, विदर्भ यूथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष डॉ. नितीन धांडे आदी उपस्थित राहणार आहे.