व्हॉट्सअॅपवरुन मदत, MBBS विद्यार्थ्याच्या मदतीने रेल्वेत प्रसुती

0
7

नागपूर,दि.10- अहमदाबाद-पुरी एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या गर्भवतीला अचानक प्रसुतिवेदना सुरु झाल्या. त्यावेळी तिच्या मदतीला धावून आला तो अवघा 24 वर्षांचा एमबीबीएसचा अंतिम विद्यार्थी. विशेष म्हणजे व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून वरिष्ठांची मदत घेत विपीन खडसे या विद्यार्थ्याने महिलेची सुरक्षित डिलीव्हरी केली.विपीन नागपूरच्या शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसचा विद्यार्थी आहे. मात्र असं असतानाही या हुशार विद्यार्थ्याने ही गुंतागुंतीची प्रसुती पार पाडली. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ व ‘मटा’ वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.
अहमदाबाद-पुरी एक्स्प्रेसमध्ये 24 वर्षीय चित्रलेखा ही गर्भवती अहमदाबादला चढली. प्रवासादरम्यान तिला अचानक प्रसुतिवेदना सुरु झाल्या. त्यावेळी ट्रेन नागपूरपासून 30 किलोमीटर अंतरावर होती. चित्रलेखाच्या नातेवाईकांनी वर्धा जंक्शनजवळ साखळी खेचून ट्रेन थांबवली. टीसी आणि गार्डने ट्रेनमध्ये डॉक्टर शोधण्यास सुरुवात केली.यावेळी आमिर खानच्या ‘थ्री इडियट्स’ ची आठवण यावी असे एक बाळंतपण एक्स्प्रेस ट्रेन मध्ये झाले.बाळंतपण करणारा मुलगा मात्र इंजिनीअरींगचा नव्हता, तर भावी डॉक्टरच होता. शिवाय तो स्काइपवर नव्हे तर त्याच्या वरिष्ठांशी चक्क व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून मार्गदर्शन घेत हे अवघड बाळंतपण पार पाडत होता. एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षाला असणाऱ्या विपीन खडसे या मुलाने अहमदाबाद-पुरी एक्स्प्रेसमध्ये एका महिलेची सुखरूप प्रसूती केली. या महिलेने मुलाला जन्म दिला.
ही प्रसूती अवघड होती कारण बाळाच्या डोक्याऐवजी खांद्याकडचा भाग बाहेर आला होता. विपीनने त्याचा फोटो व्हॉट्स अॅपवर अपलोड केला आणि डॉक्टरांची मदत घेतली. शिखा मलिक या वरिष्ठ डॉक्टरांनी विपीनला मार्गदर्शन केले. विपीनने टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले, ‘महिलेचे गर्भातले पाणी पूर्णपणे कोरडे झाले होते. रक्तस्राव होत होता. मला रक्तस्राव थांबण्यासाठी थंड पाण्याच्या बाटल्यांचा वापर करावा लागला. ट्रेनमध्ये एक सुईणीचे काम करणारी महिलाही होती, तिची मला मदत झाली.’असे त्यांनी सांगितले आहे.या विद्यार्थ्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.ट्रेन नागपूर स्थानकात येताच रेल्वे रुग्णालयातील महिला डॉक्टर आणि त्यांचे पथक आले. बाळाच्या आईला औषधे देऊन त्याच ट्रेनमधून पुढील प्रवास करण्याची डॉक्टरांनी अनुमती दिली.