छोट्या पुलावरील बॅरीकेटस पडल्याने एक जखमी

0
7

गोंदिया,दि.12-गोंदिया शहराच्या मध्य भागात असलेल्या जुन्या ओव्हरब्रिजवर मंगळवारला लावण्यात आलेला जड वाहन प्रतिबंधाचा लोखंडी गेट(बॅरीकेट)ला एका खासगी बसने दिलेल्या धक्याने पडल्यामुळे त्याचवेळी तिथून जाणार्या मोटारसायकलचालकावर पडल्याने तो इसम जखमी झाल्याची घटना घडली.जखमी इसमाचे नाव दामोदर वटवानी असे असून प्रकृती चिंताजनक असल्याने उपचाराकरीता खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे 
गोंदिया शहराच्या मध्य भागातून जाणाऱ्या मुबई हावडा रेल्वेमार्गावर हा ओव्हरब्रिज अंदाजे ६० वर्षा पूर्वी तयार करण्यात आला आहे.या पुलाला काही ठिकाणी तळे गेल्याने आणि मोठी दुर्घटना होऊ नये या उद्देशाने शेजारीच नवा उड्डाण पुल तयार करण्यात आला.जुन्या पुलावरुन जडवाहतूक बंद करण्याचा निर्णय नगर परिषदेने आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला त्यामुळे जड वाहन जाऊ नये यासाठी कमी उंचीचे बॅरीकेट लावण्यात आले. मात्र त्याची माहिती नसल्याने वाहनचालकांनी मंगळवारला रात्री 10 वाजेच्या सुमारास बालाघाटच्या दिशेने गोंदियाशहराकडे येत असलेल्या रायल टॅव्हल्सच्या बसने त्या लोखंडी गेटला धडक दिली.तेवढ्यातच मोटारसायकलने येत असलेल्या वटवानी यांच्या डोक्यावर ते गेट पडल्याने त्यांच्या डोक्याला व हाताला दुखापत झाली.हा उड्डाण पूल काही दारु दुकानांना वाचविण्यासाठी नगरपरिषदेने ताबडतोब आपल्या ताब्यात घेतल्याची चर्चा सुरु आहे.