लोहारा येथील आदिवासी कार्यकारी संस्थेचे निवडणूक कार्यक्रम जाहीर

0
12

देवरी, ता.१७- देवरी तालुक्यातील लोहारा येथील आदिवासी विविध कार्यकारी संस्थेच्या (र.न.१३३१) कार्यकारी मंडळाची निवडणूक येत्या २८ मे रोजी होऊ घातली आहे. या निवडणुकीचा कार्यक्रम तालुका सहकारी निवडणूक अधिकारी तथा सहकार अधिकारी यांनी जाहीर केला आहे.
सविस्तर असे की,तालुक्यातील लोहारा येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या कार्यकारी मंडळाची मुदत संपत आल्याने नवीन कार्यकारिणी पदाधिकाèयांची निवडणूक नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या सहकारी संस्थेवर एकूण १३ सदस्य निवडून द्यावयाचे आहेत. यात सर्वसाधारण आदिवासी खातेदार कर्जदार प्रतिनिधी (जागा ६), सर्वसाधारण बिगर आदिवासी खातेदार कर्जदार प्रतिनिधी (जागा २) अनुसूचित जाती/जमाती प्रतिनिधी (जागा १), महिला प्रतिनिधी आदिवासी (जागा २) इतर मागासवर्गीय प्रतिनिधी (जागा १) भटक्या विमुक्त जाती/जमाती/ विशेष मागास प्रवर्ग (जागा १) जागांचा समावेश आहे. यावेळी प्रत्येक मतदारांना १३ ही जागांसाठी मतदान करावयाचे आहे.
निवडणूक कार्यक्रम या प्रमाणे आहे. १७ एप्रिल निवडणूक कार्यक्रम आणि प्राथमिक मतदार यादी प्रसिद्ध करणे, १७-२१ एप्रिल प्राथमिक मतदार यादीवरील दावे व आक्षेप मागविणे, २४ एप्रिल प्राथमिक मतदार यादीवरील दावे व आक्षेप यावर निर्णय, २५ एप्रिल अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे, २६ ते ३० एप्रिल नामनिर्देशनपत्र दाखल करणे, २ मे नामनिर्देशनपत्राची यादी प्रसिद्ध करणे, ३मे अर्जाची छाननी,४ मे रोजी वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे, १९ मे अर्ज मागे घेणे व त्याच दिवशी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करणे व बोधचिन्हाचे वाटप, २८ मे रोजी मतदान, मतमोजणी आणि निकाल जाहीर करणे.