नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र पानवठ्यावरील सर्वेक्षण होणार २५ एप्रिल पर्यंत अर्ज मागविले

0
7

गोंदिया,दि.१७ : नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र गोंदिया येथे बुध्द पौर्णिमेला १० ते ११ मे २०१७ पर्यंत ‘पानवठ्यावरील सर्वेक्षण-२०१७ङ्क होणार आहे. या सर्वेक्षणात सहभागी होवू इच्छिणाऱ्या निसर्ग विषयक कार्य करणाऱ्या इच्छूक व अनुभवी निसर्गप्रेमींनी ुुु.ारहरषेीशीीं.र्सेीं.ळप या संकेतस्थळावरुन अर्ज व अटी-शर्ती डाऊनलोड करुन अर्ज भरावे. अर्ज भरुन वू.वळीशलीेंीपपींीऽसारळश्र.लो या ई-मेल पत्त्यावर २५ एप्रिल २०१७ पर्यंत पाठवावेत. १५ एप्रिल पासून संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध आहेत. अर्जामध्ये आपला ई-मेल व मोबाईल नंबर लिहावा, जेणेकरुन या सर्वेक्षणासंबंधी संपर्क करता येईल. ही प्रगणना नि:शुल्क असून अंतिम सहभागी निसर्गप्रेमींना स्वत: संपूर्ण तयारीनिशी या सर्वेक्षणास उपस्थित राहायचे आहे. या प्रगणनेत अनुभवी व प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल. इच्छुकांनी प्रगणनेत सहभागी होवून सहकार्य करावे. असे आवाहन नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे(साकोली) उपसंचालक अमलेंदू पाठक यांनी केले आहे.