सुभाष बागेत पक्ष्यांकरिता कृत्रिम पाणवठे जेसीआयचा पुढाकार

0
20
गोंदिया,दि.17 :  उन्हाळ्यातील वाढत्या तापमानामुळे पाण्याअभावी अनेक पक्षांचा मृत्यू होतो .त्यामुळे या पक्षांकरिता पाण्याची सोय व्हावी हा हेतू समोर ठेवून जेसीआय गोंदिया राईस सिटीच्यावतीने येथील सुभाष बागेत कृत्रीम पाणवटे लावण्यात आले.पक्ष्यांच्या संवर्धनाकरिता राबविण्यात आलेल्या या मोहीमेच्या पहिल्या दिवशी ३०० मातीच्या भांड्यांचे वितरण बागेमध्ये व बागेत मॉर्निग वॉक करण्यासाठी आलेल्या  नागरिकांना करण्यात आले.तसेच बागेमध्ये मार्निंग वाकला येणाऱ्यांना या भांड्यात पाणी टाकण्याची जवाबदारी देण्यात आली.एकूण ११०० मातीची भांडी हि पक्षांकरिता बागेसह शहरातील विविध शासकीय कार्यालयात लावण्यात येणार असून. वाढत्या मागणीप्रमाणे सुद्धा ते नागरिकांना मोफत देण्यात येणार आहे.या अभियानात गोंदिया नगर परिषदचे उपाध्यक्ष शिव शर्मा, पुरुषोत्तम मोदी, जेसीआय अध्यक्ष ओमप्रकाश सपाटे, सौरभ अग्रवाल, मंजू कटरे, सेजल पटेल, स्वाती चव्हाण, मधुलिका नागपुरे, सौरभ जैन, अंकुश डोडानी, कृष्णा शेंडे, नितीन मेश्राम, विशाल ठाकूर, निलेश फुलबांधे, राम ललवाणी,शैलेंद्र कावळे, उमंग साहू, प्रणय अग्रवाल, सागर सोनावणे,  रेखा केलनका, शाहीन कुरेशी,श्रृती अग्रवाल, दिशा कुरुष्णानी, अंजली कौशीक, प्रितिशा केलंनका, फरजाना अंसारी,वाणी लांजेवार, वैशाली यानी सहभाग घेतला.