कर्जमुक्तीला घेऊन राष्ट्रवादीचे देवरी व गोरेगावात आंदोलन

0
7

देवरी/गोरेगाव,दि.19 :देवरी व गोरेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शेतकर्‍यांचे पूर्ण कर्ज माफ करून ७/१२ कोरा करा अशा विविध मागण्यांना धरून शेतकर्‍यांचा मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा देवरीच्या मुख्य मार्गाने काढून देवरीच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. तिथे आपल्या पक्षातर्फे शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांचे निवेदन रा.काँ.च्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी एम.एच. टोनगावकर यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केले.तर गोरेगाव येथील तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करुन तहसिलदार कल्याण डहाट यांच्यामार्फेत निवेदन पाठविण्यात आले.
देवरी व गोरेगाव येथील  मोर्चाचे नेतृत्व गोंदिया जिल्हा राकाँचे अध्यक्ष विनोद हरिणखेडे, जि.प.चे माजी अध्यक्ष विजय शिवणकर, कृउबासचे सभापती रमेश ताराम, राकाँतालुकाध्यक्ष महेशकुमार जैन, किसान आघाडी राकाँचे जिल्हाध्यक्ष मनोहर चंद्रिकापुरे,  राकाँ महिला जिल्हाध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर,देवरी तालुकाध्यक्ष पारबताताई चांदेवार, महिला व बालकल्याण सभापती दविन्दर कौर भाटीया, अर्चना ताराम, मायाताई निर्वाण,गोरेगाव तालुकाध्यक्ष केवल बघेले,सोमेश रहागंडाले,श्रीप्रकाश रहागंडाले,आरती तुरकर,माजी जि.प.सभापती पंचम बिसे,डाॅ.रुस्तम येळे,प्रदिप जैन आदींनी केले.