‘वीरा’ चा रक्ताक्षरी अभियान 1 मे पाळणार काळा दिवस

0
15

भंडारा,दि.26-  1 मे काळ्या दिवसापासून ते महीन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 31 मे पर्यंत वीरा च्या वतीने जिल्ह्यात रक्ताक्षरी अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी जिल्ह्यातील प्रत्यक गावक-यांनी दिलेल्या नोंदवहीत रक्ताची स्वाक्षरी करून आपली वेगळ्या विदर्भाची मागणी बळकठ करावी आणि महिलांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा असे आवाहन पूर्व विदर्भाच्या महिला आघाडीच्या संयोजिका सरिता निंबार्ते यांनी यावेळी केले.

1 मे हा काळा दिवस पाळण्यासाठी विदर्भराज्य आघाडी तर्फे नुकतेच शासकीय विश्राम गृह भंडारा येथे बैठकीचे आयोजन केले गेले.बैठकीला जिल्हाध्यक्ष अँड पद्माकर टेम्भुर्णीकर, सचिव राकेश भास्कर, पूर्व विदर्भ महिला आघाडीच्या संयोजिका सरिता निंबार्ते, समाज प्रवर्तक शब्बीर पठाण, दीपक जांभुळकर, अविनाश पनके, रमाकांत पशीने, केशव हूड, सचिन बांडेबूचे, मनोज इरले, अजय मेश्राम, प्रा.वडेटावार, संतोष लांजेवार, सोमनाथ खांडे, अमित टीचकुले, वृंदा गायधने, निहार बुलबुले, विलास शेंडे माधव फसाटे, देवदास गभने व इतर विदर्भवादी उपस्थित होते.

1मे 1960 ला विदर्भ महाराष्ट्रात विलीन झाला आणि त्याच दिवसापासून सुजलाम सुफलाम विदर्भाच्या लयाला सुरुवात झाली. शेतकरी आत्महत्या,बेरोजगारी वाढून विदर्भाचा बॅकलॉग दिवसेंदिवस वाढतच गेला. राजकीय पक्षांनी वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर येथील जनतेची नेहमीच फसवणूक करून सत्ता काबीज केली. विदर्भाच्या मागणीसाठी आमगाव ते खामगाव पदयात्रा काढणारी भाजपाई सुद्धा काँग्रेस प्रमाणे केवळ आश्वासन देऊन विदर्भ मागणीला सत्तेत येताच विसरून गेले. आता वेगळ्या विदर्भाची मागणी विदर्भातील जनतेची असून ती सरकार पुढे विविध पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न होत आहे. 1 मे पासूनच विदर्भाची उतराती कळा लागली आणि म्हणून हा दिवस विदर्भ राज्य आघाडी काळा दिवस म्हणून दरवर्षी पाळत आली. ह्या वर्षी सुद्धा ह्या काळ्या दिवसाला व्यापक स्वरूप प्राप्त व्हावे म्हणून भंडारा जिल्यातील प्रत्येक तालुक्यात व मोठ्या खेड्यात विदर्भाचा ध्वज फडकवून काळा दिवस पाळण्यात येईल. अशी माहिती वीरा चे सचिव राकेश भास्कर यांनी दिली. वीरा जे जिल्हा अध्यक्ष ऍड.पद्माकर टेम्भुर्णीकर यांनी हा कार्यक्रम नसून हा आमचा विदर्भ मागणीचा एक मार्ग आहे. उदर्भातील जनतेनी ह्या काळ्या दिवसाच्या कार्यक्रमाप्रसंगी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
ह्या