गराड्यात बिबट्याने केली वासराची शिकार

0
11

आर्थिक मदतीची मागणी

गोरेगाव ता ३ मे (प्रतिनिधी)- गोरेगाव वनपिरक्षेत्रातील गराडा बीटात 1 मे च्या मध्यरात्री एका शेतकऱ्याच्या गोठ्यातून बिबट्याने  2 महिन्याचे लहान वासरू शिकार करून जंगलात पसार झाल्याची घटना घडली.

सविस्तर असे की, गोरेगाव वनपरिक्षेत्रात मोडणाऱ्या गराडा बिटात १ मे च्या रात्री लक्ष्मणराव चंद्रीकापुरे  यांच्या गोठ्यातून गाईचे दोन महिने वयाच्या वासराची शिकार करून जंगलाच पसार झाला. या घटनेची माहिती ऑनलाइन अर्जाव्दारे लक्ष्मणराव चंद्रीकापुरे यांनी वनविभागाला  २ मे ला दिली.  घटनेचे गांभीर्य ओळखून वनपिरक्षेत्राधिकारी जाधव यांनी घटनास्थळी  भेट दिली. यावेळी वनपरिरक्षक वैशाली भलावी, वनरक्षक व्ही पी कटरे, डि जी जचपेले यांना पंचनामा करीता पाठविले
घटनेच्या दिवशी चंद्रिकापुरे यांच्या गोठ्याच पाच जनावरे होती. त्यापैकी लहान वासराची शिकार करून बिबट्याने त्याने  अर्धा किलोमीटर दूर जंगलात फरफटत नेले. दुसऱ्यादिवशी शोधाशोध केल्यानंतप गावकऱ्यांना बांबूच्या रांजीत त्या बछड्याचे लचके तोडलेले शरीर दिसले.

गराडा बिट हे भाग आरक्षित वनपरिसरात येत असल्याने गराडा ते जांभुरपाणी रस्त्यावर नेहमी बिबट्याचे दर्शन नागरिकांना होत असते. परंतु, कधीही मानवी जिवनास नुकसान झाले नाही. पण गाईच्या वासराची शिकार केल्याने या परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याने केलेल्या शिकारीचा मोबदला देण्यात यावा व बिबट्यावर वनविभागाने नियत्रंण ठेवावे असी मागणी लक्ष्मनराव चंद्रीकापुरे यांनी केली आहे