पर्यावरणाच्या जनजागृतीची चळवळ होणे आवश्यक : डॉ. डोंगरवार

0
12
अर्जुनीत मोटार वाहन प्रदूषण चाचणी केंद्र सुरू
गोंदिया, दि.3 (प्रतिनिधी)-दिवसेंदिवस वाढणारी वाहनांची संख्या तसेच गत काही दशकात घटलेले जंगलांचे प्रमाण यामुळे पर्यावरणाचे संतुलन ढासळत चालले आहे. जगभरात ‘ग्लोबल वार्मिंग’ हा यक्ष प्रश्न बनला आहे. त्यामुळे वातावरणातील तापमानातही सातत्याने वाढ होत आहे. जागतिक पातळीवरून यासाठी काही ठोस कायदे केले असले तरी, यासाठी जनतेने स्वतः जागृती दाखविणे गरजेचे आहे. पर्यावरण संरक्षणाची जबाबदारीही केवळ शासनाची नसून जनतेतही चळवळ उभी राहिल्यास पर्यावरणाचे संतुलन राखता येईल, असे प्रतिपादन देव्हाडा साखर कारखान्याचे संचालक डॉ. गजानन डोंगरवार यांनी केले.
ते १ मे ला अर्जुनी-मोर येथे इंडियन मोटार वाहन प्रदूषण चाचणी केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी प्रामुख्याने अर्जुनी-मोरचे तहसीलदार डी.सी. बोम्बार्डे, पोलिस निरीक्षक बंडगर, नायब तहसीलदार केदार, अर्जुनी-मोरचे नगराध्यक्षा पोर्णिमा शहारे, जि.प. सदस्य गिरीष पालीवाल, भाजपा आदिवासीचे नेते डॉ. नाजुक कुंभरे, नगरसेविका वंदना शहारे, गिता ब्राम्हणकर, प्रज्ञा गणवीर बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. पोमेश रामटेके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना डोंगरवार म्हणाले की, वाहनातून निघणाèया धुरामुळे अनेक व्याधी सामान्य नागरिकांना होत असतात. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपल्या वाहनांची नियमित प्रदूषण चाचणी करणे गरजेचे आहे. नागरिकांनी केवळ कायद्यावरच अवलंबून न रहता, पर्यावरण रक्षणाची जबाबदारी स्वतः स्वीकारल्यास पर्यावरणाच्या दृष्टीने ते निश्चितच फायद्याचे ठरेल असे ते म्हणाले. यावेळी तहसीलदार बोम्बार्डे, ठाणेदार बंडगर, डॉ. कुंभरे, गिरीष पालीवाल यांनी समायोचित विचार व्यक्त करताना पर्यावरणाचा संतुलन राखण्यावर भर दिला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अ‍ॅड. राजेश पालीवाल व अ‍ॅड. तुळशीकर यांनीही प्रयत्न केले