कौशल्याच्या माध्यमातून रोजगार निर्मितीवर भर

0
5

कौशल्याच्या माध्यमातून रोजगार निर्मितीवर भर

खा. नाना पटोले यांचे केंद्रीय कौशल विकासमंत्री राजीव प्रताप रूढी यांचेशी चर्चा

गोंदिया. दि.३- भौगोलिक परिस्थितीबद्दल शिक्षण देणे गरजेचे असून केंद्रीय कौशल्य विभागाच्या माध्यमातून भंडारा-गोंदिया जिल्ह्यात रोजगार निर्मितीवर भर असल्याचे खा. नाना पटोले यांनी केंद्रीय कौशल्यविकास मंत्री राजीव प्रताप रूढी यांची भेट घेऊन चर्चा करताना सांगितले.
कौशल्य विकास विभागातर्फे अनेक योजना राबवल्या जात आहेत. भंडारा गोंदिया जिल्ह्यात भौगोलिक परिस्थितीबाबत शिक्षण देणे गरजेचे आहे. केंद्रीय कौशल्य विभागाच्या वतीने रोजगार निर्मिती केली जाऊ शकते. त्याकरिता जिल्ह्यात प्रशिक्षण केंद्र उघडण्यात येतील. या माध्यमातून तरुणांना योग्य प्रशिक्षण देऊन रोजगाराची संधी मिळू शकते. तरुणांना रोजगार निर्मितीच्या उद्देशाने भंडारा गोंदिया जिल्ह्यात योजना आखण्याचे काम सुरू आहे. कौशल्य विकासाच्या माध्यमातून अनेक बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. केंद्रीय कौशल्य विकास मंत्री राजीव प्रताप रूढी यांचेशी खा. नाना पटोले यांनी भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली. रोजगाराच्या संधी निर्माण करणे व त्यांना स्वयंपूर्ण करणे प्रत्येक हाताला काम देणे आवश्यक असल्याने त्यांना आवड असलेल्या क्षेत्रात त्यांचे प्रशिक्षण देऊन कुशल व अकुशल कामगार निर्माण करणे व अशा हातांना काम देणे, यासाठी शासन कटिबद्ध असून त्यासाठी केंद्राच्या कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून अनेक योजना राबविल्या जात आहेत.