पालकमंत्र्यांच्या हस्ते करांडली येथे भूमीपूजन,दिनकरनगरला भेट

0
10

अर्जुनी मोरगाव,दि.१४: तालुक्यातील करांडली येथे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते मुलभूत सुविधा योजनेअंतर्गत धनराज जांभूळकर ते केशव नंदेश्वर यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकामाचे व आदिवासी उपयोजने अंतर्गत पाणी टाकी ते योगेश कुळमेथे यांच्या घरापर्यंतच्या रस्ता डांबरीकरणाचे भूमीपूजन करण्यात आले.त्यानंतर पालकमंत्र्यांनी दिनकरनगरला भेट देऊन तेथील जनतेच्या समस्या जाणून घेतल्या.बंगाली बांधवाच्या समस्या सोडविण्यासाठी आपण सदैव तत्पर असल्याचे आश्वासन त्यांनी ग्रामपंचायत भवनात आयोजित सभेत ग्रामस्थांना सांगितले.यावेळी जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, पं.स.सभापती अरविंद शिवणकर, जि.प.सदस्य तेजुकला गहाणे, पं.स.सदस्य रामलाल मुंगणकर, अर्चना राऊत, माजी जि.प.सभापती प्रकाश गहाणे, उमाकांत ढेंगे, तहसिलदार बांबोर्डे, गटविकास अधिकारी नारायण जमईवार, सरपंच सरस्वता शेंडे, उपसरपंच योगेश कुळमेथे,सरपंच खोकन सरकार, उपसरपंच सचिन घरामी उपस्थित होते. पालकमंत्री बडोले म्हणाले की, बंगाली शाळांमध्ये बंगाली शिक्षक असावे ही आपली जुनी मागणी आता लवकरच पूर्ण होणार आहे. बंगाली शिक्षक भरतीबाबतचा प्रस्ताव शिक्षण आयुक्त पूणे यांचेकडे पाठविण्यात आला आहे. इथल्या शेतकèयांच्या सोसायटीला धान ठेवण्यासाठी जागा उपलब्ध झाल्यास त्याठिकाणी गोडावून बांधून देण्यात येईल.दिनकरनगर येथे २५१५ या मुलभूत सुविधा योजनेअंतर्गत बांधण्यात येणाèया अंतर्गत सिमेंट नाली बांधकामाचे भूमीपूजन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.