गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार गाळ शेतात टाकून शेतीची उत्पादकता वाढवा- बडोले

0
12

गोरेगाव,दि.१४: गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही अभिनव योजना आहे. लोकसहभागातून गाळ काढणे हे योजनेअंतर्गत करण्यात येत आहे. शेतकरी बांधवांनी तलावातील जास्तीत जास्त गाळ आपल्या शेतात टाकून शेतीची उत्पादकता वाढवावी असे आवाहन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेचा शुभारंभ पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी आज१४ मे रोजी गोरेगाव तालुक्यातील मुंडीपार ग्रामपंचायत अंतर्गत येणाèया सलंगटोला तलाव येथे केला. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे,जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, उपविभागीय अधिकारी सिध्दार्थ भंडारे, जि.प.सदस्य ललिता चौरागडे, पं.स.सदस्य केवल बघेले, अल्का काटेवार, जि.प.लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पथाडे, तहसिलदार कल्याणकुमार डहाट, गटविकास अधिकारी डी.बी.हरिणखेडे, उपअभियंता आर.आर.चौधरी, शाखा अभियंता गोवर्धन बिसेन,प्रदिप रहांगडाले, मुंडीपार सरपंच सिंधू मोटघरे, मुरदोली सरपंच ससेंद्र भगत उपस्थित होते.
पालकमंत्री यावेळी म्हणाले, गोंदिया हा तलावांचा जिल्हा आहे. जिल्ह्यातील अनेक माजी मालगुजारी तलाव हे गाळाने भरले आहेत. या योजनेमुळे जिल्ह्यातील तलावातील गाळ मोठ्या प्रमाणात काढण्यास मदत होणार आहे. हा गाळ शेतीत टाकण्यात येणार असल्यामुळे शेतीची उत्पादकता वाढण्यास मदत होणार आहे. गाळ काढण्यात येणार असल्यामुळे तलावातील पाणीसाठ्यात वाढ होणार आहे. हा पाणीसाठा शेतकèयांना रब्बी हंगामासाठी उपयुक्त ठरणार आहे. जिल्ह्यातील तलाव, धरणातील गाळ काढण्याचे नियोजन यंत्रणांनी करावे. त्यामुळे शेतकèयांचे चांगले दिवस येतील.यावेळी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीही विचार व्यक्त केले.
सलंगटोला तलावातील गाळ काढून आपल्या शेतात टाकणारे शेतकरी लक्ष्मणराव चंद्रिकापुरे, शशी भगत, दामोदर शहारे, ठेकचंद ठाकुर यांचे पालकमंत्र्यांनी पुष्पगुच्छ देवून आभार व्यक्त केले. गराडा, मुंडीपार व सोदलागोंदी ग्रामपंचायत अंतर्गत येणाèया शेतकèयांच्या शेतात या तलावातील गाळ टाकण्यात येणार आहे.