१ जूनला गोंदियात राष्ट्रवादीचे आंदोलन

0
14

गोंदिया,दि.२३-जिल्ह्यातील बाई गंगाबाई महिला रुग्णालयातील बिघडलेली अवस्था आणि गेल्या काही दिवसापासून होत असलेल्या बालमृत्यूच्या प्रश्नाला घेऊन येत्या १ जून रोजी गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रीय नेते व खासदार प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात आंदोलन करणार असल्याची माहिती प्रवक्ते गंगाधर परशुरामकर यांनी दिली आहे.त्याचप्रमाणे जिल्ह्यातील शेतकरी प्रश्नावरही प्रशासनाला धारेवर धरले जाणार आहे.बीजीडब्लू प्रकरणातील तातडीने चौकशी करुन दोषीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही पटेलांनी केल्याचे म्हटले आहे.गेल्या दीड महिन्यात ३४ बालकांचा झालेला मृत्यू म्हणजे आरोग्य यंत्रणेतील मोठ्या घोडचूका असल्याचे पटेलांनी म्हटले आहे.सोबतच पिडीत कुटुqबयाना आर्थिक मदत तातडीने देण्यात यावी.शहरातील या रुग्णालयात रुग्णांशी अशाप्रकारे खेळले जात असेल तर ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात काय अवस्था असेल असा प्रश्नही उपस्थित केला आहे.