साहेब गोंदियातील कंत्राटी अभियंत्याच्या बदल्या होणार काय

0
64

गोंदिया,दि.२३-राज्य सरकारच्या नियोजन(रोहयो)विभागाच्या उपसचिवांनी १० एप्रिल रोजी पत्र काढून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत एकाच ठिकाणी अधिक कार्यकाळ झालेल्या कंत्राटी अभियंत्यांच्या बदल्या करण्यासंदर्भात पत्रव्यवहार राज्यातील सर्वच रोहयो उपजिल्हाधिकाèयांना केला आहे.तसेच पत्र गोंदियाच्या रोहयो उपजिल्हाधिकारी यांना पण मिळालेले आहे.आज त्या पत्राला महिना लोटला परंतु गोंदिया जिल्ह्यातील मग्रारोहयोच्या कंत्राटी अभियंत्याच्या पंचायत समित्या बदल्यांसदर्भांत कुठलीच हालचाल दिसून येत नसल्याने साहेब कंत्राटी अभियंत्याच्या कधी होणार बदल्या अशा प्रश्न एकाच ठिकाणी असलेल्याकडून विचारणा केली जात आहे.या कंत्राटी अभियंत्याची निवड जरी संस्थेमार्फेत केली गेली असली तरी त्या संस्थांनाही असे पत्र दिले गेले नसल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयातंर्गत असलेल्या रोहयो विभागाची तर देवरी,आमगाव व गोेरेगाव पंचायत समितीवर मेहरबानीच दिसून येत आहे.या तिन्ही पंचायत समितीमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत जे काही कंत्राटी अभियंते,संगणक ऑपरेटर घेण्यात आले,त्यांनी तर ठाणच मांडले आहे.सध्या ज्या धडक qसचन विहिरीचा कार्यक्रम राबविला जात आहे.त्यामध्ये तर या अभियंत्यावर विशेष करुन गोरेगाव पंचायत समितीमध्ये तर १० ते १५ हजार रुपये घेऊन विहीरी देण्याचे व बांधकामात कमी सिमेंट वापरासाठी पदाधिकारी व अभियंत्यांनीच लागेबांधे केल्याची चर्चा आहे.त्यामुळेच की काय येथील पदाधिकारी याठिकाणच्या कंत्राटी अभियंत्यांना सोडण्यासाठी पुढाकार घेत नाही.त्यातच या पंचायत समितीमधील एक कंत्राटी अभियंता हा मग्रारोहयोमध्येही काम करतो आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कंत्राटही घेतो असे बोलले जाते नव्हे तर त्या अभियंत्याने काम करीत असल्याची कबुलीही दिली आहे.त्यामुळे एकाच ठिकाणी तळ ठोकून बसल्याचा काय गैरफायदा होतो हे जाणूनच उपसचिवांनी पत्र काढले परंतु जिल्हास्तरावर स्थानिक संस्थांशी संगनमत करुन अधिकारी पदाधिकारी हे त्याच अभियंत्यांना आपल्या पंचायत समित्यामध्ये ठेवण्यासाठी लॉबीग करीत असल्याचे चित्र फडणवीसांच्या तरी कार्यकाळात बंद होणार यात शंकाच आहे.