महिला बालकल्याण विभागाचे कर्मचारी देशभ्रतारला लाच घेताना अटक

0
10

गोदिया,दि.२४-  जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागाचे कनिष्ट सहाय्यक प्रविण देशभ्रतार यांना सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज सकाळच्या सुमारास पाचशे रुपयाची लाच घेताना ताब्यात घेतले.फिर्यादीचे कम्पुटर इस्टिटुुट असून महिला बालकल्याण विभागातर्गत एमएससीआयटी मार्फत विद्यार्थ्याना शिकविले जाते.फिर्यादीच्या संस्थेत १३ विद्यार्थीचे अनुदान मंजुर झाले.ते देण्यासाठी एका विद्यार्थ्यामागे ५० रुपये असे ६५० ची मागणी केली.परंतु पैसे देण्याची ईच्छा नसतानाही ५०० रुपये देण्याचे ठरले.फिर्यादीने याची तक्रार लाचलुचपत विभागाकडे नोंदवली.त्यानुसार आज सापळा रचण्यात आला.ही कारवाई गोंदिया एसीबी कार्यालयाच्या पथकाने केली.