एग्रो डिलर्स एसोसिएशनच्या कार्यशाळेला प्रशिक्षणार्थ्यांची प्रतिसाद

0
14

गोंदिया,दि.२५ – गोंदिया डिस्ट्रीक्ट एग्रो डिलर्स असोशिएशन च्यावतीने आज गुरुवारला येथील ग्रण्ड सिता होटल येथे खत व कृषी बियाणे विक्रेत्यांच्या प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.कार्यशाळेत येत्या १ जून पासून आधारकार्डच्या माध्यमातून  खत विक्री करण्यात येणार असून अनुदान शेतकर्याच्या बँक खात्यात जमा होणार असून हे विक्रीसाठी सर्व खत विक्रेत्यांना पोस मशीन ठेवावे लागणार आहे.या मशीनच्या वापरासंबधीची माहिती कंपनीच्यावतीने देण्यात आली.या कार्यशाळेला व सभेला जिल्हा कृषी अधिक्षक अनिल इंगळे,जिल्हा विकास कृषी अधिकारी कु.वंदना शिंदे,रुची गृपचे मॅनेजिंग डायरेक्टर भालचंद्र ठाकूर,असो.अध्यक्ष विजय अग्रवाल  यांच्यासह कृषी अधिकारी उपस्थित होते.संचालन अमर वराडे यांनी केले.