गोरेगाव बाजार समितीच्या सभापतीपदी पारधी तर उपसभापती कटरे

0
8

गोरेगाव,दि.25(berartimes.com)- येथील गोरेगाव कृषि उत्पन बाजार समितीच्या संचालकपदाकरीता झालेल्या 7 मे रोजीच्या निवडणुकीत सर्वाधिक संचालक निवडून भारतीय जनता पक्षाने बाजार समितीवर वर्चस्व मिळविले होते.19 पैकी 11 संचालक भाजपचे तर 8 संचालक काँग्रेस राष्ट्रवादीचे निवडून आले होते.त्या बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी आज गुरुवारला झालेल्या निवडणुकीत भाजपचे योगराज पारधी यांची सभापतीपदावर तर व्यंकट कटरे यांची उपसभपाती निवड करण्यात आली.नवनिर्वाचीत सभापती व उपसभापती यांचे स्वागत आमदार विजय रहागंडाले, माजी खासदार डाॅ.खुशाल बोपचे,तालुकाध्यक्ष डाॅ.लक्ष्मण भगत,पंचायत समितीचे सभापती दिलीप चौधरी,उपसभापती सुरेंद्र बिसेन,बँकेचे संचालक रेखलाल टेंभरे,जिल्हा परिषद सदस्य विश्वजित डोंगरे,ऋषीपाल टेंभरे,नितिन कटरे,सुरेंद्र पटले,नगरसेवक सुरेश रहांगडाले आदींनी केले.