मॉईल प्रशासनाला ५ जूनपर्यंत अल्टीमेटम

0
11

तुमसर,दि.30 : डोंगरी मॉईल प्रशासनाच्या विरोधात सतत ८५ दिवसांपासून पिडीत कुटुंबांवर होत असलेला अन्याय थांबविण्यासाठी योग्य त्या मागार्ने स्थानिक ग्रामस्थ तथा शेतकऱ्यांनी १५ मे पासून आमरण उपोषण मॉईलच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सुरु केले आहे. तत्पूर्वी प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता ५ मार्च पासून साखळी उपोषण सुरु केले आहे. परंतु या पिडीत कुटुंबांचे प्रशासनाने सुद्धा दखल घेतली नाही. शिवसेनेने पिडीत उपोषणकर्त्यांची भेट घेत त्यांचा व्यथा जाणून घेतल्या.संबंधित मागण्या ५ जूनपर्यंत मंजूर न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला. चर्चेदरम्यान जिल्हा प्रमुख इंजि. राजेंद्र पटले,उपसभापती शेखर कोतपल्लीवार, सुधाकर कारेमोरे, प्रकाश पारधी, दिनेश पांडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमित मेश्राम, नरेश उचीबघेले, प्रकाश लसुन्ते, मनोज चौबे, नितीन सेलोकर, जगदीश त्रिभुवनकर, किशोर यादव, कृपाशंकर डहरवाल आदी शिवसैनिक उपस्थित होते.

विशेष म्हणजे दुसऱ्याच दिवशी मॉईल प्रशासनातील अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. परंतु प्रश्न न सोडवता निघून गेले. शिवसेनेनी खाणग्रस्त पिडीत कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी गंभीर इशारा दिला आहे. यासंदर्भात अधिकाऱ्यांशी तिसरी बैठक २८ मे रोजी पार पडलीे. या बैठकित ५ जूनपर्यंत खाणग्रस्त पिडीत कुटुंबांच्या मागण्या निकाली काढण्याचे ठोस आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी दिले. मागण्यांमध्ये ब्लास्टिंगच्या रोज झटक्यामुळे परिसरातील राहत असलेल्या घरांच्या भिंतीना तडे गेले असल्याने त्या कुटुंबांचे पुनर्वसन सुरक्षित ठिकाणी करण्यात यावे, पिडीत कुटुंबांच्या नौकऱ्या देण्यात यावीे, मॉईलच्या उत्खनामुळे निर्माण झालेले मातीचे ढिगारे दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करावे, आदी मागण्यांचा समावेश आहे. यावेळी मॉईल प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी फाकनिक, भट्टाचार्य, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी, तहसीलदार गजेंद्र बालपांडे, नायब तहसीलदार गोंड उपस्थित होते. यावेळी जिल्हा प्रमुख इंजि. राजेंद्र पटले यांनी पिडीत कुटुंबियांची चर्चा केली.