उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेला अचानक लागली आग

0
16

अमरावतीदि. 30रुग्णांच्या सेवेकरिता २४ तास सेवा देण्याकरिता अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बाहेर रुग्णवाहिका उभ्या असतात. अश्याच एका रुग्णवाहिकेला सोमवारच्या रात्री अचानक आग लागली. आग लागल्यानंतर काही वेळातच ही रुग्ण वाहिका जळून कोळसा झाली. अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बाहेर उभ्या असलेल्या रुग्णवाहिलेला रात्री ११ च्या सुमारास अचानक आग लागली. पाहता पाहता या रुग्णवाहीकेला लागलेल्या आगीने रौद्र रूप धारण केले. त्यानंतर लगेचच अग्निशामक दलाला याची माहिती देण्यात आली. परंतु अग्निशामक दलाचा पाण्याचा बंब घटनास्थळी पोहचे पर्यंत ही रुग्णवाहिका जळून राख झाली होती. शॉर्ट सर्किट मुले ही आग लागल्याचे यावेळी परिसरतात बोलल्या जात होते.