नवजात मुलांच्या मृत्यूप्रकरणी आरोपी डॉ. भूषण कट्टाला अटक

0
24
अमरावती, दि. 30 – डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय रुग्णालयात (पीडीएमसी) रविवार (28 मे)  मध्यरात्री एकापाठोपाठ एक चार नवजात बालकांचा अकस्मात मृत्यू झाल्याने एकच खळबळ होती. याप्रकरणी आरोपी डॉक्टर भूषण कट्टाला अटक करण्यात आली आहे. डॉक्टर कट्टाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन ही कारवाई करण्यात आली आहे.  महाविद्यालयाचे डीन दिलीप जाणे, डॉ. पंकज बारब्धे, डॉ. प्रतिभा काळे यांना देखील या प्रकरणात सहआरोपी ठरवण्यात आले आहे