निर्जंतुकीकरण न केल्याने 4 बालकं दगावली!

0
21

अमरावती,दि.31: डॉ. पंजाबराव देशमुख रुग्णालयातील 4 नवजात शिशूंच्या मृत्यूप्रकरणी धक्कादायक चौकशी अहवाल समोर आला आहे.निर्जंतुकीकरणाकडे सातत्याने दुर्लक्ष केल्यानेच ही दुर्घटना घडल्याचं उघड झाले आहे.अतिदक्षता विभागात दर आठ दिवसांनी निर्जंतुकीकरण करणं बंधनकारक आहे. त्याबाबत मायक्रो बायोलॉजी विभागानेही तब्बल 13 वेळा सूचना दिल्या होत्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.निर्जंतुकीकरण न केल्यामुळे आयसीयू विभागात जंतूची लागण झाली होती. त्यामुळे एका बालकाचा मृत्यू झाला होता. त्याची लागण 3 नवजात बालकांना झाली, असा अहवाल 5 डॉक्टरांच्या चौकशी समितीने दिला आहे.