आमदार यशोमती ठाकूर यांचा शेतकरी आंदोलनात सहभाग

0
6
अमरावती, दि. 5 – काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी राहटगाव येथे शेतक-यांच्या आंदोलना पाठिंबा देत त्यात सहभागही नोंदवला. यावेळी त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी देत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील वाहतूकही रोखून धरली.आंदोलनकर्त्यांनी यावेळी रस्त्यावर जाळपोळदेखील केली. यशोमती ठाकूर यांनी शेतक-यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत संपूर्ण कर्जमाफीची मागणी केली.  जाळपोळ आणि तीव्र आंदोलनामुळे काही काळासाठी परिसरात तणाव निर्माण झाला होता. कर्जमाफीसहीत विविध मागण्यांसाठी शेतक-यांनी राज्यभरात पुकारलेल्या संपला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.  यवतमाळ शहरातील व्यापारी प्रतिष्ठाननंही कडकडीत बंद पाळला आहे. शेतक-यांच्या मागण्यांची पूर्तता करण्यास शासनाकडून होत असेलल्या दिरंगाईला विरोध दर्शवण्यासाठी शेतक-यांनी बसस्थानक चौकात मुंडण करून शासनाचा निषेध केला.