अंत्ययात्रा काढून नांदेडात शेतकर्यानी नोंदविला शासनाचा निषेध

0
12

नरेश तुप्तेवार

नांदेड,दि.०५-महाराष्ट्र बंदला शहरासह जिल्हाभरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, अनेक तालुक्यात क्षणाची प्रतीकात्मक अंत्ययात्रा तर काही ठिकाणी पुतळा जाळून व बाजारपेठ बंद ठे ऊन केदार व राज्य सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच सरसकट कर्जमाफी देण्यात यावी अशी मागणी करण्यात अली आहे.
नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे शिवसेना व शेतकरी संघटना व ईतर संघटनेचे वतीने सोमवार रोजी सकाळी शहरातील बाजारपेठ बंद करण्यात आली. तर देगलूर आगारातील एस टी महामंडळाची बसेस दररोजच्या वेळापत्रकाप्रमाणे सुरळीत चालू होती. माहुर शहरात शेतकरी संप झाला असून, सोमवारचा  माहुरचा आठवडी बाजार बंद करण्यात आला होता. त्यामुळे सर्वच दुकाने बंद दिसून आल्याने बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. उमरी शहरात सर्व पक्ष आणि शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारी शहरातून  मोर्चा काढण्यात आला. आणि बाजारपेठ बंद ठेवण्याच्या आव्हानाला सर्वानी प्रतिसाद दिल्यामूळे उमरी  बंद शंभर टक्के यशस्वी झाला आहे. यावेळी उमरी येथील शेतकऱ्यानी सरकारची प्रतिकात्मक अंत्ययाञा काढली होती. छावा संघटना व शिवसेना तर्फे धर्माबाद येथील बाजापेठ बंद करण्यात आली होती. भोकर तालुक्यातील भोसी येथे मुख्यमंत्री फडणवीस यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळून जाहीर निषेध व्यक्त करत महाराष्ट्र बंद मध्ये शेतकरी सहभागी झाले होते. हिमायतनगर शहरातील कृषी दुकानदारांनी स्वतः दुकाने बंद ठेऊन शेतकऱ्याच्या बंदला पाठिंबा दिला,