उत्तम व्यक्तिमत्व असणं ही अमूल्य संपत्ती – प्रशांत वाघाये

0
28

लाखनी,दि.08-व्यक्तिमत्व हे प्रत्येकाला हवहवसं वाटते, उत्तम व्यक्तिमत्व आकार घेण्यासाठी सकारात्मक विचारांना दिशा देने गरजेचे आहे, असे प्रतिपादन व्यक्तिमत्व विकास विषयाचे अभ्यासक प्रशांत वाघाये यांनी केले. ते स्वप्नपुर्ती फाउंडेशन व समर्थ महाविद्यालय लाखनी द्वारे आयोजित व्यक्तिमत्व विकास व वक्तृत्व प्रशिक्षण कार्यशाळेच्या चवथ्या सत्रात व्यक्तिमत्व विकास व संवाद कौशल्य या सत्राचे मार्गदर्शक म्हणून बोलत होते. सोबतच सत्राध्यक्ष म्हणून प्राध्यापक सकारात्मक दृष्टिकोन, आत्मविश्वास हे चांगल्या व्यक्तिमत्वाचे गुणवैशिष्ट्ये आहेत. असे उत्तम व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू प्रशांत वाघाये यांनी उलगडले.
सत्राध्यक्ष उमेश सिंगणजुडे म्हणाले की विद्यार्थी, युवक तसेच व्यावसायिकांनी आणि समाजातील सर्व घटकांनी आपल्या व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
या सत्राला अनेक प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. त्यापैकी काही प्रशिक्षणार्थीनी सराव सत्रात अंधश्रद्धा निर्मूलन मार्गदर्शन या कार्यक्रमाची तयारी आणि सराव केला.चार दिवस चाललेल्या या कार्यशाळेच्या समारोपिय सत्राला कार्यशाळा संयोजक अंगेश बेहलपांडे, स्वप्नपूर्ती फाउंडेशनचे सचिव सुधीर काळे, सदस्य भारती वाघाये, संजय वनवे, उमेश सिंगणजुडे, विशाल हटवार उपस्थित होते. समारोपिय सत्रात अनेक प्रशिक्षणार्थीनी आपले मनोगत व्यक्त केले. अशा प्रकारच्या कार्यशाळेचे आयोजन पहिल्यांदाच लाखनी येथे केले होते. कार्यशाळेच्या या सत्राचे सूत्रसंचालन राकेश वाघाये यांनी तर अतिथिंचा परिचय भारती वाघाये आणि आभार कार्यशाळा संयोजक अंगेश बेहलपांडे यांनी केले.
कार्यशाळेच्या यशश्वीतेसाठी कार्यशाळा संयोजक अंगेश बेहलपांडे, स्वागताध्यक्षा आशा वनवे, स्वप्नपूर्ती फाउंडेशनचे सुधीर काळे, किशोर वाघाये, आशीष राऊत, सुभाष गरपडे, नीलेश राऊत, लक्ष्मण बावनकुळे, मीनाक्षी सिंगणजुडे, कल्पना सावरकर, राकेश वाघाये, नितेश टिचकुले, सागर साखरे यांनी परिश्रम घेतले.