सडक अर्जुनी,गोरेगावात अतिक्रमण हटाओ मोहीम: गोंदियात मात्र पदाधिकारीच रक्षणकर्ते

0
6

गोंदिया,दि.23:राज्यसरकारने स्पष्ट सुचना देऊनही गोंदिया शहरातील अतिक्रमण मे व जून महिना लोटला असतानाही गोंदिया नगरपरिषदेच्या अध्यक्ष वगळता इतर सभापती व नगरसेवकांच्या विरोधामुळे हटविता आले नसल्याचे स्पष्ट झाले असतानाच या गोंदिया नगरपरिषदेला तमाचा लावत सडक अर्जुनी व गोरेगाव सारख्या नवख्या नगरपंचायतीनी मात्र अतिक्रमण मोहिम हटवून चांगलीच चपराक दिली आहे.पालकमंत्री बडोले यांनीही जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन अतिक्रमण हटविण्यासाठी सर्व मदत देण्याचे निर्देश दिले होते.परंतु फोटोग्राफीत रमलेल्या जिल्हाधिकार्यांना सुध्दा गोंदिया शहराचे अतिक्रमण हटविण्यासाठी पुढाकार घ्यायला वेळच मिळाली नाही.त्यातच गोंदिया पालिकेच्या सर्वच सभापतींनी अतिक्रमणकर्त्यांची बाजू घेतल्याने ही मोहीमच थंडावली यावरुन पदाधिकारी हे मूठभर अतिक्रमित व्यापारी वर्गासाठी काम करीत असल्याचे गोंदिया शहरातील थांबलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेवरुन साफ झाले आहे.

सडक-अर्जुनी, गोरेगाव व गोंदिया या राज्यमार्गाला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ असा दर्जा देण्यात आला आहे. त्यासाठी रस्त्याचे रूंदीकरण केले जाणार आहे. मात्र या मुख्य मार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढल्याने वाहतुकीला त्रास होऊन येथे अपघात घडत होते. यावर शहरात अतिक्रमण मोहीम राबवून गुरूवारी (दि.२२) शहरातील या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करण्यात आला.कोहमारा ते सडक-अर्जुनी या दोन किलोमीटरच्या मार्गावर व्यवसायीकांनी आपले व्यवसाय थाटून घेतले. दुकानाचे बोर्ड व सामान लोकांना दिसावे यासाठी व्यवसायीकांकडून रस्त्यावर ठेवले जात होते. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरच आपली वाहने ठेवावी लागत होती. परिणामी नागरिकांना या रस्त्याने ये-जा करणे त्रासदायक ठरत होते. स्टेट बँकेसमोर पार्कींगची सुविधा नसल्यामुळे तेथेही लोकांना आपली वाहने रस्त्यावरच उभी करून जावे लागत होते. यामुळे या मार्गावर दर आठ दिवसांनी एक-दोन अपघात नेहमीत घडत होते. अतिक्रमणामुळे विकासकामांना अडथळा होत होता. याची दखल घेत नगरपंचायतने अतिक्रमण धारकांना अनेकवेळा नोटीस दिले. मात्र नगर पंचायतच्या पोकळ धमक्यांना अतिक्रमणधारकांनी कधीच दाद दिली नाही.अशात राष्ट्रीय महामार्ग उप विभागाकडून उपविभागीय अभियंता यांनी तहसीलदार, नगरपंचायत मुख्याधिकारी यांना पत्र पाठवून अतिक्रमण काढण्यात सहकार्य करण्याचे कळविले. त्या अनुषंगाने संबंधीत अतिक्रमण धारकाना ८ फेब्रुवारी रोजी अतिक्रमण काढण्याबाबत नोटीस बजावून २२ जून रोजी अतिक्रमण काढले जाणार असल्याचे सांगण्यात आले होते.

ठरल्यानुसार गुरूवारी (दि.२२) अतिक्रमण काढण्यास सुरूवात करण्यात आली. रस्त्याच्या मधून ४० फूट असे अंतर मोजून दोन जेसीबी लावून पोलीसाच्या ताफ्यात अतिक्रमण हटविण्यास सकाळी १० वाजता सुरूवात करण्यात आली. या अतिक्रमणात अनेक पानटपऱ्या, दुकानांचे शेड स्वत: काढायला लोकांनी सुरूवात केली. अतिक्रमण हटाओ मोहीम राबविताना राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता लभाने, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, ठाणेदार केशव बाभळे, तहसीलदार विठ्ठल परळीकर, नायब तहसीलदार अखीलभारत मेश्राम, खोकले, नगर पंचायतचे अधिकारी संदीप रूद्रवार यांच्यासह पोलीस विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

सडक अर्जूनी मध्ये होत असताना गोंदिया शहरातही होऊ शकते परंतु आमदार गोपालदास अग्रवाल,माजी आमदार राजेंद्र जैन,नगरपरिषदेचे आजी माजी सभापती,सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्याने सरकारी जागेवर केलेले अतिक्रमण,नाल्यावर बांधलेले ओटे तोडण्याची यांची स्वतःची हिमंत नसल्याने मारहाण व गोंधळाची स्थिती निर्माण करुन अधिकारी यांना चाकू व दंडुकाच्या धाक दाखविण्याचा प्रकार सुरु झाला आहे.चाकू व दंडुक्याच्या धाकामूळेच गोंदिया शहर घाणमय,अतिक्रमणयुक्त व गुंडप्रवृत्तीचे शहर म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.गोंदियाच्या तिरोडा बायपास रस्त्यावर विभाजकाचे काम सुरु करण्यात आले ते निकृष्ट दरर्ज्याचे असून त्यासाठी खोदलेला रस्ताची गिट्टी आजही रस्त्यावर पसरली असल्याने वाहतुकदारांना त्रास सहन करावा लागत आहे.परंतु कंत्राटदार आपल्या शक्तीचा धाकदपटशाहीचा वापर करुन कार्यकारी अभियंता,उपअभियंत्याना मला काही म्हणू नका असे म्हणत दादागिरी करीत असल्याची चर्चा आहे.