सामाजिक न्याय दिनानिमित्त सामाजिक न्याय भवनात कार्यक्रम

0
13

गोंदिया,दि.२३ : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस २६ जून हा दरवर्षी सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून २६ जून रोजी दुपारी ४ वाजता सामाजिक न्याय भवन येथे समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पालकमंत्री राजकुमार बडोले हे कार्यक्रमाचे उदघाटन करतील. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे असतील. विशेष अतिथी म्हणून खा.प्रफुल पटेल, खा.नाना पटोले, खा.अशोक नेते, आमदार सर्वश्री डॉ.परिणय फुके, प्रा.अनिल सोले, ना.गो.गाणार, गोपालदास अग्रवाल, विजय रहांगडाले, संजय पुराम, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, पोलीस अधीक्षक दिलीप पाटील-भूजबळ, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त माधव झोड, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त देवसुदन धारगावे, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, समाज कल्याण समिती सभापती देवराज वडगाये, नगराध्यक्ष अशोक इंगळे, फुरचूरच्या सरपंच लक्ष्मी कटरे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
तरी नागरिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलींद रामटेके व जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी गौतम वाकोडे यांनी केले आहे.