राणी दुर्गावतींचा बलिदान दिवस साजरा

0
12
गोंदिया,दि.२५ जून : आदिवासी समाज गोंदियाच्या वतीने  गोंडीटोला कटंगी येथे २४ जून रोजी गोंडवाना विरांगणा महाराणी दुर्गावती यांचा बलिदान दिवस शहिद स्मृती दिन म्हणून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  आदिवासी नेते गुलाबसिंह कोडापे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी गोवारी नेते गोकुळ बोपचे, दिनेश कोहळे, तुळशिराम कोडापे, सामाजिक कार्यकर्ते ब्रिजलाल मडकाम, सामाजिक कार्यकर्ते अशोक पाटील, कृष्णाजी पुâन्ने, योगराज कोहळे, माजी उपसरपंच सौ.मंदाताई मेश्राम आदि मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात  कार्यक्रमाचे अध्यक्ष गोपालसिंह ऊईके यांच्या हस्ते गोंडवाना साम्राज्याचा  ध्वजाचे  अनावरण करून करण्यात आले. दरम्यान गोंडी ध्वजगीताने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमात उपस्थितांना राणी दुर्गावतीच्या जीवन कार्यावर प्रकाश टावूâन मार्गदर्शन केले. यावेळी  गोंदिया शहरातील नविन  उड्डाणपुलाला न.प.चे माजी विद्यार्थी व कटंगीकलाचे मुळ निवासी लोकनेते माजी आमदार नारायणसिंह ऊईके यांचे नाव देण्यात यावे, आणि गोंडीटोला कटंगी येथील चौकाला ‘खिला मुठवा चौक गोंडिटोला’असे नाव देण्यात यावे, असे दोन ठराव पारीत करण्यात आले.  कार्यक्रमाचे प्रास्तविक कमल कोडापे यांनी तर सुत्रसंचालन दामोदर नेवारे यांनी केले. कार्यक्रमात उपस्थितांचे आभार सामाजिक कार्यकर्ते पेंटर मडकाम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ठाणीराम धुर्वे, ग्रा.पं सदस्या संगिताताई कोडापे, पुरणलाल चौधरी, लक्ष्मणसिंह ऊईके, शामलाल राऊत, लखनलाल वघारे आदिंनी अथक परिश्रम घेतले .