आरमोरीत ओबीसी युवा महासंघाची बैठक उत्साहात

0
7

आरमोरी,दि.04- येथील सीएमएच कम्पुटर संस्थेच्या कार्यालयात पार पडलेल्या राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाच्या बैठकित गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी आरक्षणासह दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय महाधिवेशनाच्या तयारीबाबत चर्चा करण्यात आली.बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संघटक प्रा.शेषराव येलेकर होते.बैठकीत युवकांना ओबीसी चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे विदर्भ प्रमुख रुचित वांढरे यांनी केले.प्रा.येलेकर यांनी गडचिरोली जिल्ह्यात कमी झालेे ओबीसी आरक्षण पुर्ववत करण्यासाठी जनचळवळ लोकामध्ये निर्माँण करण्यावर भर देत राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या नेतृत्वात सर्वांना संघटित होण्याचे आवाहन केले.या बैठकीत ओबीसीची जनगणना, ओबीसी स्कालर्शिप, नॉनक्रेमीलेयर प्रमाणपत्र , कास्ट्सर्टिफिकेटसह इतर मुद्यावर मार्गदर्शन करण्यात आले.सोबतच  7 आॅगस्ट रोजी दिल्ली येथे आयोजित ओबीसी अधिवेशनाला जास्तीत जास्त लोकांनी हजर राहावे असे आवाहन करण्यात आले.यावेळी रुचित वान्ढरे,सुनील चरडुके,महेंद्र शेंडे,मुकुल खेवले आदी मंचावर उपस्थित होते.संचालन महेश उरकूडे यांनी केले .कार्यक्रमाला भोयर,धोटे,वागतुरे,झरकार,शेडे,पत्रे,कोडवे,सपाटे,सोनटक्के व हर्षे उपस्थित होते.