भिसी ग्रापच्या सरपंचपदी काँग्रेसच्या योगिता गोहने विजयी

0
11

चिमूर,दि.04- तालुक्यातील भिसी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आज ४ जुर्लेला झालेल्या निवडणुकीत काॅंग्रेसच्या योगिता गोहने अविरोध निवडून आल्या.या निवडणुकीत भाजपच्या सरपंचपदाच्या उमेदवाराला स्वतःचा गर्विष्टपणा महागात पडल्याचे दिसून आले.भिसीचे सरपंच अरविंद रेवतकर यांना तीन अपत्ये असल्याने न्यायालयीन लढाईत ते हरल्याने सरपंच पद रद्द झाले होते.त्या रद्द पदासाठी ४ जुर्लेला निवडणूक पार पडली.निवडणुकी पूर्वी कांग्रेस ने ११ सदस्यांना देवदर्शनला पाठवून बहुमताचा आकडा ताब्यात ठेवला होता. १५  सदस्य असलेल्या ग्रापमध्ये निवडणुकीत ११ सदस्य काॅंग्रेसकडे तर ४ भाजपकडे होते.
काॅग्रेसच्या  योगिता गोहनेची सरपंचपदी निवड झाल्याबद्दल आयोजित विजयी सभेच्या अध्यक्षस्थानी जि.प.गट नेते डाॅ. सतीश वारजूकर होते.यावेळी तालुका अध्यक्ष माधव बिरजे,जि.प.सदस्य ममता डुकरे,घनश्याम डुकरे,प.स. सदस्य रोशन ढोक, माजी सरपंच अरविंद रेवतकर, विजय गावनडे, कृउबा संचालक अमोद गौरकर आदी उपस्थित होते. संचालन उपसरपंच  लीलाधर बनसोड यांनी तर आभार ग्रा. प. सदस्य अविनाश रोकडे यांनी केले. यावेळी ग्रापं सदस्य ,काॅंग्रेस पदाधिकारी,नागरीक उपस्थित होते.