अध्यक्ष,उपाध्यक्षातील समन्वयचा फटका स्थायीची बैठक तहकुब

0
9

गोंदिया,दि.07-गोंदिया जिल्हा परिषदेच्या सभागृहात आज शुक्रवारला महत्वपुर्ण मानली जाणारी स्थायी समितीची सभा आयोजित करण्यात आली होती.वास्तविक सर्वसाधारण सभेच्या आधी स्थायी समितीची सभा आणि त्याआधी सर्व विषय समितींच्या सभा होणे आवश्यक आहे.परंतु गेल्या अाठवड्यात सर्वसाधारण सभा घेण्यात आली.त्यानंतर आज शुक्रवारला स्थायी समितीची सभा आयोजित करण्यात आली होती.त्याचवेळी दुसरीकडे अर्थसमितीच्या सभापती असलेल्या उपाध्यक्षांनी अर्थ समितीची बैठक सुध्दा आजच आयोजित केल्याने अध्यक्ष व उपाध्यक्षांत समन्वयाचा अभाव असल्याचे चित्र दिसून आले.विशेष म्हणजे अनेकदात स्थायी समितीच्या सभेला तहकुब करुन महत्वपुर्ण विषयावर होणारी चर्चा टाळली जात असल्याचे लक्षात आले.आज जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागातील सावळागोंधळ स्थायी समितीच्या बैठकीत चर्चेला येण्याची शक्यता होती.परंतु ती सभाच तहकुब करण्यात आली.या बैठकीसाठी बीडीओ व  पंचायत समितीचे सभापती हे सुध्दा उपस्थित झाले होते.स्थायी समितीचे काही सदस्यही हजर होते.