वाहनगाव ग्राम पंचायतीने अतिक्रमण काढण्याचा ग्रामसभेने घेतला ठराव

0
12

चिमूर,दि.09-चिमूर तालुक्यातील वाहनगाव ग्रामपंचायतच्या समाजमंदिराच्या जागेवर गावातीलच एका कुटूंबाने केलेले अतिक्रमण हटविण्याचा ठराव ग्रामसभेने सर्वसमितीने पारीत केल्याची माहिती पत्रकार परिषदेत सरपंत कलावती जुमनाके व उपसरंपच प्रशांत कोल्हे यांनी दिली.वाहनगाव ग्रामपंचायतीच्या दुकानचाळ असलेल्या रस्त्यालगतच्या मोकळ्या जागेवर समाजमंदिरासाठी जागा नियोजित करण्यात आली होती.परंतु गावातील एका कुटूंबाने त्या जागेवर आपल्या धर्माचा झेंडा लावून अतिक्रमण केल्याने गावात शांतता भंग होण्याची शक्यता निर्माण झाली होती.त्यामुळे ग्रामसभेने ते अतिक्रमण काढण्याचा ठराव बहुमताने पारित केला असून तालुका प्रशासनाने अतिक्रमण काढण्यासाठी सहकार्य करावे अशी मागणी पत्रकार परिषदेमध्ये सरपंच कलावती जुमनाके,उपसरपंच प्रशांत कोल्हे,ग्रामपंचायत सदस्य नरेश वलंके,अर्चना थुटे,प्रतिभा गुडधे,अपर्णा बरबातकर,अरुण दोडके यानी केली आहे.