अभियंत्याने फाडले वीज कंत्राटदाराचे बिल

0
6

चिमूर,दि.14-महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी चिमूर अंतर्गत खडसंगी डीसी कार्यालयात अभियंता प्रवीण आसुटकर कार्यरत असून या कार्यालयामध्ये वीज मेंटनन्ससाठी कंत्राटदार कैलास लोणारे याना वीज कार्यालय वरोरा कडून मजूर पुरविण्याचे आदेश असताना मागील तीन महिन्याचे बिल प्रस्ताव अभियंता आसुलकर यांचेकडे दिले असता त्यांनी मात्र फाडून टाकले त्यामुळे कंत्राटदार यांनी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
अभियंता आसुलकर यांनी कार्यालयात बसणारे तीन मजुरांचे बिल समाविष्ट करण्याचे कंत्राटदार लोणारे यांना सांगितले पण कंत्राटदार यांनी ते मान्य केले नाही फक्त आपलेच तीन मजूर माहे एप्रिल, मे. जून १७ या तीन महिन्याचे बिल प्रस्ताव अभियंता असुटकर यांच्याकडे दिले असता त्यांनी उर्मटपणे ते फाडून टाकले यामुळे कंत्रातदाराला बिल न मिळाल्याने मजुरांवर उपासमारीचीची पाळी येण्याची शक्यता आहे या प्रकाराची चौकशी करून अभियंता असुटकरवर कारवाई करण्याची मागणी कंत्राटदार कैलास लोणारे यांनी केली आहे.
कंत्राटदाराचे बिल फाडले नाही – आसुलकर
महाराष्ट्र्र राज्य विद्युत वितरण कंपनी चिमुर अंतर्गत येत असलेल्या खडसंगी डीसी कार्यलयाअंतर्गत वीज मेंटनन्ससाठी कंत्राटदार मार्फत मजूर पुरवठा केला जातो परंतु कंत्राटदाराने अनावश्यक वीज मेंटनन्स बिल काढण्यासाठी जबरदस्ती केली परंतु तसे न केल्याने कंत्राटदार ने स्वत:च बिल फाडले असल्याची माहिती वीज अभियंता प्रवीण आसूलकर यांनी दिली.